पंचगंगेत ध्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगेत ध्यान
पंचगंगेत ध्यान

पंचगंगेत ध्यान

sakal_logo
By

पंचगंगा रुग्णालयातर्फे
गर्भवतींसाठी ध्यान शिबिर

कोल्हापूर, ता. २४ : महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयाच्या वतीने गर्भवतींसाठी घेतलेल्या ध्यान शिबिरात डॉ. स्नेहल भोकरे, मिनाक्षी जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गर्भवतींना ध्यान केल्यामुळे होणारे फायदे सांगण्यात आले. ध्यान केल्यामुळे ताणतणाव कमी होतो, परिणामी बाळाची वाढ चांगली होत असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. हार्टफुलनेस मेडीटेशनच्या डॉ. भोकरे व जाधव यांनी ध्यानाचे महत्व सर्व गरोदर मातांना पटवून दिले. आरोग्यधिकारी डॉ. रमेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. शिबीराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या हेरवाडे यांनी केले. मिनाक्षी तांदळे यांनी आभार मानले. शिबिर दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सोमवारी पंचगंगा रुग्णालयात होणार असून गर्भवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.