गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

७८१५६
करंबळी : सामुहिक घुग्गुळोत्सव कार्यक्रमात युवकांनी सहभाग घेतला होता.

करंबळीत सामुहिक गुग्गुळोत्सव
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे सामुहिक घुग्गुळोत्सव कार्यक्रम झाला. यामध्ये २३ युवक सहभागी झाले होते. करंबळीत वीरशैव लिंगायत संप्रदाय आहे. या संप्रदायात घुग्गुळ काढण्याची परंपरा आहे. सुरगीश्वर मठाचे सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या उपस्थितीत घुग्गुळ कार्यक्रमाचे विधी पार पडले. स्वामीजी म्हणाले, ‘‘असे कार्यक्रम गावात होणे गरजेचे आहे. नव्या पिढीला यातून परंपरेचे ज्ञान होईल.’’ गावातील सामाजिक सलोखा अशा कार्यक्रमातून राखला जात असल्याचे सरपंच अनुप पाटील यांनी सांगितले. सुधाकर पाटील, आर. एस. पाटील, मलगोंडा पाटील, शंकर पाटील, एम. डी. पाटील, निंगोंडा पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
--------------
ओंकारमध्ये राष्ट्रीय मतदार दिन
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. प्रबोधनपर व्याख्यान झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी लोकशाही मूल्ये व मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. आयेशा कासिमभाई हिने जनजागृती प्रतिज्ञा दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. काशिनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता पोळ, मुख्य लिपिक प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले.
---------------
पार्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत यश मिळविले. ६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. इलिमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एक विद्यार्थी अ श्रेणीत, सात विद्यार्थी ब श्रेणीत तर ३० विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९०.३२ टक्के लागला. एक विद्यार्थी अ श्रेणीत, आठ विद्यार्थी ब श्रेणीत तर २२ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. दत्ता लोहार यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांचे प्रोत्साहन लाभले.
--------------
७८१५७
ओंकार घोटणे

ओंकार घोटणे जिल्ह्यात दुसरा
गडहिंग्लज : हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलचा विद्यार्थी ओंकार घोटणे याने जिल्हास्तरीय शासकीय शालेय कराटे स्पर्धेत यश मिळविले. १७ वर्षांखालील ३८ किलो वजनी गटात त्याने दुसरा क्रमांक मिळविला. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांचे प्रोत्साहन तर दत्तात्रय हजारे यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------------
घाळीमध्ये नव्या अभ्यासक्रमाचा प्रारंभ
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र विभागातर्फे इंटरप्रिटेशन ऑफ एनएमआर स्प्रेक्ट्रा या अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. किरण पाटील यांनी स्वागत केले. समन्वयक प्रा. एस. डी. जाधव यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. या अभ्यासक्रमात १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. प्रा. विवेक इंगळे, प्रा. पंकज डाफळे, प्रा. किरण धनवडे, डॉ. एस. ए. मस्ती, प्रा. अनिल मगर आदी उपस्थित होते. प्रा. ए. जी. गोडघाटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com