ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा उद्यापासून रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा उद्यापासून रंगणार
ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा उद्यापासून रंगणार

ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा उद्यापासून रंगणार

sakal_logo
By

ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा
उद्यापासून रंगणार
विविध वजनीगटांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः फ्री स्टाईल गटातील प्रेक्षणीय लढतीनंतर आता शिवाजी विद्यापीठात शुक्रवार (ता. २७) पासून आंतरविद्यापीठ ग्रीको रोमन प्रकारातील कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. विविध वजनी गटांत होणाऱ्या स्पर्धेत देशभरातील विविध १५० विद्यापीठांमधील सुमारे ८०० मल्ल सहभागी होणार आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष आणि शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवनिमित्त अखिल भारतीय विद्यापीठ महासंघातर्फे फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन गटात कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यातील फ्री स्टाईल प्रकारातील स्पर्धेचा समारोप मंगळवारी झाला. आता ग्रीको रोमन प्रकारातील स्पर्धा शुक्रवार ते रविवार (ता. २९) होईल. त्यात पहिल्या दिवशी ५५, ६३, ७२, ८२ किलो वजनगट, शनिवारी ६०, ६७, ७७, ९७ आणि रविवारी ८७ आणि १३० किलो वजनी गटातील लढती होतील. स्पर्धेतील पहिल्या आठ क्रमाकांच्या विजेत्या मल्लांची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

आंतरराष्ट्रीय मल्ल लढले...
या स्पर्धेतील स्टाईल प्रकारात विविध वजनीगटातून आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त मल्ल लढले. त्यात सुमित, अनिल, अमितकुमार, उदित, मोहित, सुशील, सागर, सोमवीर, अक्षयकुमार, आकाश अंटिल, अनिरुद्ध (हरियाणा) यांचा समावेश होता. त्यांचे कुस्तीतील तंत्र अनेकांना समजून घेता आले, अशी माहिती कुस्ती स्पर्धेचे तांत्रिक संचालक डॉ. बंकट यादव यांनी दिली.