पाण्यासाठी रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्यासाठी रास्ता रोको
पाण्यासाठी रास्ता रोको

पाण्यासाठी रास्ता रोको

sakal_logo
By

78266

हॉकी स्टेडियम चौकात
महिलांचा रास्तारोको

बालाजी पार्क, म्हाडा कॉलनी परिसरात पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर, ता. २५ : महिन्याभरापासून बालाजी पार्क, म्हाडा कॉलनी परिसरातील इतर कॉलनींमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. यामुळे आज संतप्त झालेल्या महिला, नागरिकांनी हॉकी स्टेडियम चौकात रस्त्यावर टायर आणि घागरी हातामध्ये घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. येथे आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर आंदोलक संतापले. सुमारे दीड तास वाहनांच्या दोन्‍ही बाजूला रांगा  लागल्या होत्या. पोलिसांच्या विनंतीकडे लक्ष न दिल्याने पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
तोंड बघून पाणी सोडत असल्याचा आरोप केला. म्हाडा कॉलनी, शाहू कॉलनी, बालाजी पार्क, गुरु महाराज नगरी, स्वामी समर्थ अपार्टमेंट आदी भागातील नागरिक सहभागी झाले. दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तो पुरेसा नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलकांची चौकात थांबलेल्या अनेक दुचाकीस्वारांशी वादावादी झाली. पोलिस आणि ज्येष्ठांनी यात मध्यस्थी केली. 
महिन्याभरापासून लोक पाणी विकत घेत असून, दररोज पाणी विकत घेऊन पिणे शक्य नसल्याचे  नागरिकांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर महापालिका निवडणुकीत उमेदवारांना प्रभागांत येऊ देणार नाही, अशी भूमिका महिलांनी व्यक्त केली. तसेच पूर्वकल्पना न देता आंदोलन करू असे स्पष्ट केले. पाणी द्यायचं नसेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन सांगावे असे म्हणत आयुक्त आले नाहीत तर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्र घेतला. आंदोलनामध्ये दिनकर कांबळे प्रफुल्ल कांबळे, चन्नाप्पा तेलंगी, साबीर शेख, जयसिंग पाटील सचिन पडळकर, आनंद पाटील आदींनी सहभाग घेतला.