Wed, Feb 8, 2023

अभियान
अभियान
Published on : 25 January 2023, 6:13 am
स्पर्श जनजागृती
अभियान सोमवारपासून
कोल्हापूर, ता. २५ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यात महापालिका स्पर्श जनजागृती अभियान राबवित आहे.
३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत अभियान असून, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये सकाळी त्वचारोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. हेमलता पालेकर मार्गदर्शन करणार आहेत.