कसबा बावड्यात पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावड्यात पाऊस
कसबा बावड्यात पाऊस

कसबा बावड्यात पाऊस

sakal_logo
By

कसबा बावड्यात
पावसाच्या सरी
कोल्हापूर, ता. २५ : कसबा बावडा परिसरात आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. थंडीच्या दिवसात अचानक झालेल्या पावसाच्या सरीनीं हवेतील गारवा आणखी वाढवला. गेल्या आठ दिवसांपासून शहरात थंडी वाढली आहे. अशात आज सकाळी दहा वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत उकाडा जाणवला. याच वेळी ढगही दाटून आले. ऊन्हाची किरणेही लुप्त झाली यातून अचानकपणे हवामानात बदल झाल्याचे जाणवत होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर ढगाळ वातावरणात आणखी भर पडली. जिल्ह्यात काही मोजक्या भागात पावसाचा शिडकावा झाला, तर कसबा बावडा, लाईन बझार, कदमवाडी, शिये या परिसरात पावसाच्या दोन सरी येऊन बरसल्या. रस्ता ओला झाला. अचानक झालेला हवामानातील बदल मात्र लोकांना असस्वस्थ करून गेला.