पाच वर्षाचे मानधन शैक्षणिक कार्यासाठी

पाच वर्षाचे मानधन शैक्षणिक कार्यासाठी

ajr272.jpg
78554
भारती डेळेकर
----------------
पाच वर्षांचे मानधन शैक्षणिक कार्यासाठी
---
सोहाळे सरपंच भारती डेळेकरांची घोषणा; आणखी हातभार लावणार
आजरा, ता. २७ ः पाच वर्षांतील सरपंचपदाचे मानधन शैक्षणिक कार्यासाठी प्राथमिक शाळेला देणार असल्याची घोषणा सोहाळे (ता. आजरा) येथील सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांनी केली. येथील ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन सरपंच सौ. डेळेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी मानधनाची रक्कम शैक्षणिक कार्याला देणार असल्याचे भाषणात जाहीर केले. शैक्षणिक कार्याला स्वतःकडूनही भरीव रक्कम देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी घेतलेला निर्णय इतरांसाठी आदर्श वस्तुपाठ ठरणार आहे.
गावच्या विकासाचा रोडमॅप बनवणार असून, विविध विकासकामे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. विशेषतः शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम राहावा, यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मानधनातून आर्थिक मदत कमी पडत असेल तर त्यासाठी आणखी आर्थिक मदतीचा हातभार लावून शाळेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपसरपंच वसंत कोंडुसकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com