मोहाली, चंदीगढ, भटिंडा, राजस्थान विद्यापीठांना सुवर्णपदके

मोहाली, चंदीगढ, भटिंडा, राजस्थान विद्यापीठांना सुवर्णपदके

78638
कोल्हापूर ः अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धांमधील सलामीची कुस्ती शुक्रवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी उपस्थित व्ही. एन. शिंदे, सुरेशकुमार मलिक, शरद बनसोडे, आदी .

78641
कोल्हापूर ः आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेमधील रंगलेला एक सामना.

मोहाली, चंदीगढ, भटिंडा, राजस्थान
विद्यापीठांची ‘सुवर्ण’ कामगिरी

पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंचे वर्चस्व, शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः मल्लांची ताकद, चिवटपणा आणि निर्णयक्षमता यांचा कस पाहणाऱ्या ग्रीको-रोमन प्रकारांतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांना शिवाजी विद्यापीठात आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. चार विविध वजनी गटांच्या कुस्तींमध्ये चंदीगढ विद्यापीठ (मोहाली), पंजाब विद्यापीठ (चंदीगढ), गुरू काशी विद्यापीठ (भटिंडा) आणि सिंघानिया विद्यापीठ (राजस्थान) या चार विद्यापीठांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
पुरुषांच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गेल्या २२ जानेवारीपासून विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात सुरू आहेत. ग्रीको-रोमन प्रकारांतील कुस्ती स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील १३१ विद्यापीठांचे ८९४ कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. ग्रीको-रोमन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ५५ किलो, ६३ किलो, ७२ किलो आणि ८२ किलो या चार वजनी गटांतील कुस्ती स्पर्धा झाल्या. स्पर्धकांच्या तयारीचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेतील अनेक लढती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या होत्या. विशेषतः ७२ आणि ८२ किलो वजनी गटांतील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठीची झटापट आणि त्याला चकित करण्यासाठीची धडपड यांचा सुरेख मेळ घालत स्पर्धक स्वतःला सिद्ध करीत एकेक फेरी पार करीत राहिले. शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंची वाटचाल या चार गटांमध्ये बाद फेऱ्यांतच थांबली. आता उर्वरित सहा वजनी गटांमध्ये त्यांना पदकासाठी परिश्रम करावे लागतील. दरम्यान, आज सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मॅटपूजन व विविध वजनी गटांतील सलामीच्या कुस्त्या लावून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आदी उपस्थित होते.

विविध वजनी गटांतील विजेते...
या स्पर्धेतील विविध वजनी गटांतील विजेत्यांमध्ये (अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेते) ५५ किलो : ललित (राजस्थान), संजीव (पंजाब), हिमांशू सिंग (जयपूर), अनुप कुमार (उत्तर प्रदेश). ६३ किलो : रवी (भटिंडा), अश्वनीकुमार सिंग ( वाराणसी), अंकित (हरियाणा), राम परवेश (उत्तर प्रदेश). ७२ किलो: विशाल (चंदीगढ), जगमल सिंह (शिखर), सचिन (भटिंडा), साहील (पंजाब). ८२ किलो : अंकित बूरा ( मोहाली), अंकित (हरियाणा), अमन (रोहतक), सुंदर (भटिंडा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com