फसवणूक

फसवणूक

अकरा लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ : बोगस कंपनीच्या ट्रस्ट वॉलेटवरून ११ लाख ११ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित महादेव ट्रेडिंग स्टॉक्स ॲंड क्रिप्टो कंपनी, आशिष सुखराम, ताकेश्‍वर यांच्याविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी हिमजा विजयसिंह देसाई (आर. के. नगर, पाचगाव रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई यांचा मुलगा वेदराज हा शालेय विद्यार्थी आहे. त्याला मोबाईलच्या एका ॲपवरील @jackdown110 आयडीवरून गुंतवणुकीबाबत महादेव ट्रेडिंग स्टॉक्स ॲंड क्रिप्टो कंपनीचा मेसेज आला होता. त्या वेळी कंपनीकडून ते भारतीय लायसन्सधारक असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. त्याने त्यावर विश्‍वास ठेवला. कंपनीचे ऑपरेटर आशिष सुखराम व ताकेश्‍वर यांनी दिलेल्या बँक खात्यावर त्याने ३१ डिसेंबर २००२२ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान एकूण ११ लाख ११ हजार २०० रुपये भरले. त्याला त्याच्या ट्रस्ट वॉलेटवर नफा झाला असल्याचे दाखविण्यात आले. त्याने ती रक्कम काढायची आहे, असे सांगितल्यावर त्याच्याकडून फॉर्म भरून घेतला. त्यानंतर रक्कम परत न करता ट्रस्ट वॉलेट बंद करण्यात आले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com