Thur, March 23, 2023

करवीर तहसील
करवीर तहसील
Published on : 28 January 2023, 1:08 am
करवीर तहसील कार्यालय
सोमवार, मंगळवारी बंद
कोल्हापूर ः इमारतीच्या पुर्नबांधकामामुळे करवीर तहसीलदार कार्यालयातील कामकाज सोमवार (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) बंद रहाणार असल्याची माहिती तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी दिली. तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयाचे कामकाज शाहुपुरीतील बी. टी. कॉलेजमध्ये स्थलांतरीत करण्यात येत आहे. नव्या जागेत दप्तर सुव्यवस्थित लावणे, विद्युत जोडणी, इंटरनेट जोडणी व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी सर्व नागरिकांसाठी कार्यालयीन कामकाज व सेवा बंद राहतील. १ फेब्रुवारी २०२३ पासून करवीर तहसीलदार कार्यालयाचे कामकाज पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू रहाणार असल्याची माहिती मुळे-भामरे यांनी दिली.
..........