अनिल पाटील वाढदिवस

अनिल पाटील वाढदिवस

78738
कोल्हापूर ः वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारताना अनिल पाटील.

अनिल पाटील यांचा
वाढदिवस उत्साहात
कोल्हापूर, ता. २८ ः शाहूपुरीतील श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा ७२ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या सुशोभीकरणासाठी भरीव मदत, शांतिवन बीड, मातोश्री वृद्धाश्रम, सीपीआर हॉस्पिटललाही सामाजिक भावनेतून मदत करण्यात आली.
आज चौगुले संस्थेच्या २१ शाखा असून आठ जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विखुरले आहे. संस्थेने सहकाराबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्येही गुणवत्ता प्राप्त केली आहे. कोरोना काळात महापूरग्रस्तांना अन्नधान्य, जीवनावश्‍यक वस्तूंची सढळ हाताने मदत केली. याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम त्यांच्या आई-वडिलांच्या बँक खात्यात जमा करणारी ही राज्यातील पहिली संस्था ठरली आहे.
वाढदिवसानिमित्त पाटील यांना माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी फोनवरून तर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील, करवीरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील, जलसंपदा विभागाचे अजिंक्य पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक निशिकांत मेथे, सुहास लटोरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com