केएमटी प्रवासदिन

केएमटी प्रवासदिन

78746
कोल्हापूर ः केएमटी व ग्राहक पंचायततर्फे प्रवासी दिनानिमित्त केएमटीच्या प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देताना अधिकारी, कर्मचारी व पंचायतीचे सदस्य.

केएमटी, ग्राहक पंचायततर्फे
प्रवासी दिन उत्साहात
कोल्हापूर, ता. २८ ः महानगरपालिका परिवहन उपक्रम, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ यांच्यातर्फे आज ‘रथसप्तमी प्रवासी दिनाचे’ आयोजन श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे करण्यात आले होते.
प्रारंभी के.एम.टी. बसचे पूजन करुन प्रवाशांना गुलाब पुष्प आणि तिळगुळ वाटप करुन शुभेच्छा देणेत आल्या. या वेळी के. एम. टी.चे वाहतूक निरिक्षक रघुनाथ धुपकर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूरचे महानगर प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे यांनी प्रवासी दिनाच्या प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुप्रिया दळवी, अध्यक्ष महानगर कमलाकर बुरांडे, संघटक सुहास गुरव, सहसंघटक प्रशांत चौगुले, सचिव विनायक वाळवेकर, सदस्य अमर शेणेकर, गजानन जोशी, संदीप झेले, केएमटीचे लेखापाल अरुण केसरकर, स्थानक प्रमुख नितीन पवार, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com