
अधिसभेतून व्यवस्थापन परिषद सदस्य पदासाठी प्राप्त नामांकने
अधिसभेतून व्यवस्थापन परिषद
सदस्यपदासाठी ५६ नामांकने
---
खुल्या जागेत सर्वाधिक संख्या; सोमवारी अर्जांची छाननी
कोल्हापूर, ता. २८ ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेतून (सिनेट) आठ उमेदवार व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून निवडून देण्यासाठी निवडणूक अधिसूचना १८ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली होती. अधिसभेतून व्यवस्थापन परिषद सदस्यपदासाठी ५६ नामांकने प्राप्त झाली आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी (ता. ३०) होईल. बुधवारी (ता. १) सायंकाळी पाचपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
प्राचार्य, शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर आणि व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यातून प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यावयाचे होते. त्यातील प्राचार्यपदासाठी खुल्या जागेकरिता एकूण चार नामांकने, इतर मागासवर्गीय जागेसाठी दोन नामांकने प्राप्त झाली आहेत. शिक्षकांतून निवडून द्यावयाच्या खुल्या प्रवर्गाच्या जागेसाठी १५, तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी तीन नामांकने प्राप्त झाली आहेत.
नोंदणीकृत पदवीधरमधून निवडून द्यावयाच्या खुल्या जागेसाठी २६, तर डीटीएनटी प्रवर्गाच्या जागेसाठी तीन नामांकने प्राप्त झालेली आहेत. व्यवस्थापन परिषदेतील खुल्या जागेसाठी तीन, तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी एकही नामांकन प्राप्त झालेले नाही.