
कनवा काव्यसंमेलन
‘कनवा’मध्ये काव्य
मैफल करंडक स्पर्धेला प्रारंभ
कोल्हापूर, ता. २८ ः करवीर नगर वाचन मंदिर आणि गजेंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून काव्य मैफल करंडक स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज पाच संघांनी विविध विषयांवरील बहारदार कविता सादर केल्या.
दरम्यान, स्पर्धेचे उदघाटन गजेंद्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, स्पर्धा समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने, सहकार्यवाह अश्विनी वळीवडेकर, कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, कोषाध्यक्ष उदय सांगवडेकर, शाम कारंजकर, मनीषा वाडीकर, ग्रंथपाल मनीषा शेणई, मंगेश राव आदी उपस्थित होते.
करवीर नगर वाचन मंदिरात ही स्पर्धा रंगली असून सांघिक पद्धतीने काव्य वाचन करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाले असून प्रत्येक संघात चार ते सहा कवींचा समावेश आहे. उर्वरित तीन संघांचे सादरीकरण उद्या (रविवारी) होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे.