
भाज्या स्वस्त
फोटो : 78998
कोल्हापूर : नवलकोलची विक्री करताना शेतकरी.
-
फोटो : 78999
कोल्हापूर : देशी केळी स्वस्त झाल्याने ती घेण्यासाठी गर्दी होती. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)
मंडईत मुळा शेंगची आवक मोठी
नवलकोलचेही आगमन : हिरव्या वांग्याचे दर उतरले; वरणा मात्र अजूनही महाग
सकाळ वृत्तसेवा
ीकोल्हापूर, ता. २९ : या आठवड्यात मंडईत मुळा शेंग मोठ्या प्रमाणात आली आहे. ही शेंग ताजीतवानी असून, ६० किलोपर्यंत विक्री सुरु होती. याबरोबर नवलकोलचेही आगमन झाले. दोन नग १५ रुपये याप्रमाणे विक्री सुरू असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून नवलकोल येतो. सॅलडमध्ये नवलकोलचा वापर अधिक होतो. चविला गोडसर असलेल्या नवलकोलचे ज्यांना महत्व माहिती आहे, ते मात्र आवर्जून घेतात. गेल्या आठवड्यात ८० रुपये किलो असलेल्या वरण्याचे दर मात्र अजूनही कमी झालेली नाहीत. आवक कमी असणाऱ्याचा परिणाम असावा, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. दुसरे असे की, गेल्या आठवड्यात हिरवे वांगे ८० रुपये किलो होते, ते आज ४० रुपये किलोपर्यंत आले.
...
चौकट
भाज्याचे दर स्वस्त कारण...!
अनेक विक्रेते हे श्री रेणूका यात्रेसाठी सौंदत्ती डोंगराला पायी, बैलगाडी, अन्य वाहनांनी गेलेले आहेत. एक ते दिड आठवडा ते यात्रेमध्ये असणार आहेत. याशिवाय अनेक भाविकही डोंगराला गेले आहेत. परिणामी, या काळात भाज्यांचे दर उतरतात. डोंगराची यात्रा झाली, की आवक मोठी असूनही दर मुद्दामहून वाढविले जातात.
.
चौकट
देशी केळी स्वस्त
आंबट-गोड चव असलेली देशी केळी ३० रुपयांना दोन डझन तर काहीशी मोठी केळी ५० रुपयाला डझन विक्री सुरू आहे. देशी केळी घेणारा वर्ग मोठा आहे. दररोजच्या आहारात केळ्यांचा वापर होतोच. सामान्य लोकांपासून ते खेळाडू, व्यायामपटू, मल्लांपर्यंत देशी केळी घेतात. साधी केळी दहा ते २० रुपये डझनांनी विक्री सुरू आहे.
...
चौकट
भाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)
मुळा शेंग *६०
नवलकोल *१५ रुपयाला दोन नग
देशी गाजर *४०
राजस्थानी गाजर *३०
बिनिस *४०
हिरवी वांगी *४०
काळी वांगी *३०
खुटवडा शेंग *६०
काळा घेवडा *८०
ढब्बू मिरची *६०
वरणा शेंग *८०
भेंडी *८०
दूधी भोपळा *१० रुपयाला एक नग
बंदरी गवारी *८०
हिरवा वाटाणा *४०
देशी काकडी *६०
काटे काकडी *६०
वाल शेंग *८०
कारली *४०
ऊसावरील घेवडा शेंग *४०
फ्लॉवर *२० रुपये एक नग
कोबी *१०/२० रुपये एक नग
पापडी शेंग *६०
हिरवी मिरची *६०
आल्लं *६०
टोमॅटो *१०
हेळवी कांदा *१०/२०
बटाटा *२०
पांढरा कांदा *१७
केळ फुल गड्डा *३०/४०
हिरवी कच्ची केळी *४०/५०
चवदारी शेंग *४०
घोसावळे *४०
तोंदली *४०
पडवळ (आकारमानानुसार) *१०/२० रुपये नग
दोडका *४०
लसुण *१०० रुपयाला दिड किलो
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
लाल बीट *५/१०
मुळा *५/१०
शेवगा शेंग *२० रुपयाला तीन शेंगा
...
चौकट
पालेभाजी (प्रति पेंडी)
कोथींबीर *१० रुपयाला दोन पेंड्या
मेथी *१०
कांदापात *१०/१५
शेपू *१५ रुपयाला दोन पेंड्या
आंबाडा *१०
तांदळी *१५ रुपयाला दोन
लाल माट *१५ रुपयाला दोन
आंबट चका *१०
पुदीना *५/१०
कडीपत्ता *५/१०
चाकवत *५/१०
करडई *५/१०
पालक *दहा रुपयाला दोन
...
चौकट
मिरचीचे दर (प्रतिकिलो)
ओरिजनल कर्नाटकी ब्याडगी *६५० ते ८००
सिजेंटा ब्याडगी *४५० ते ६००
एमपी दिल्लीहाट ब्याडगी *३५० ते ४५०
लाली ब्याडगी *३०० ते ४५०
संकेश्वरी प्युअर *१४०० ते १८००
साधी जवारी *३५० ते ४५०
लवंगी *३०० ते ३५०
काश्मिरी *६०० ते ७५०
गरुडा *३५० ते ४००
...
धान्य-कडधान्य (प्रतिकिलो रुपये)ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तुरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मुगडाळ *११५/१२०
उडीद डाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
साबदाणा *६५/७०
साखर *४०
-
सोने-चांदीचे दर (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने........ प्रतितोळा
चांदी....... प्रतिकिलो
...