भिमा कृषी प्रदर्शन सांगता
79073
तीन दिवसात १२ कोटींची उलाढाल
खासदार धनंजय महाडिक; भिमा कृषी प्रदर्शनाची सांगता
कोल्हापूर, ता. २९ : भिमा कृषी प्रदर्शना दरम्यान तीन दिवसात ५ ते ६ लाख लोकांनी भेट दिली. १२ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. मेरी वेदर मैदानावर सुरु असलेल्या भिमा कृषी प्रदर्शनाची आज शेवटच्या दिवशी कृषी विस्तार, कृषी संशोधक, भिमा आदर्श कृषि विस्तारक, भिमा शेतीभूषण पूरस्कार देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, वंदूर (ता. कागल) येथील माजी कृषि सहसंचालक महावीर कल्लापा जंगटे यांना भिमा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, चॅम्पियन ऑफ दि शोचा बहुमाने कडला (सांगोला, सोलापूर) येथील खिलार खोंड यांने पटकावला आहे.
खासदार महाडिक म्हणाले, ‘कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान माहिती झाले पाहिजे. चांगल्या वाणांची जनावरे बघण्यास आणि त्यांचा अनुभव घेता आला पाहिजे. त्यांचे संगोपन कसे केले जाते, याची माहिती मिळाली. गेल्या तीन दिवसात कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कराड व बेळगाव येथून शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. भविष्यातही शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने पाठबळ दिले जाईल.’
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालंदर पांगारे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना भिमा कृषी प्रदर्शनाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. या प्रदर्शनात केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. शासनाने ज्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यास सांगितले आहेत. त्या सर्व योजनना या प्रदर्शनाच्या माध्यमातून पोचल्या आहेत.’
यावेळी अरुंधती महाडिक, सत्यजित कदम, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्र्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
दरम्यान, उत्कृष्ट कृषि संशोधक म्हणून डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. भिमराव कांबळे, डॉ. हनुमंत शिंदे यांना आणि जिजामाता कृषि संशोधक पुरस्कार डॉ. मनिषा मोटे व डॉ. सीमा सरवदे ( सर्व, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर) यांना गौरविणले. डॉ. रविंद्र कारंडे (कृषि महाविद्यालय), अनिकेत माने (मंडल कृषि अधिकारी, कापशी), स्मिता नावलगी (कृषि सहाय्यक), फुलसिंग आडे ( कृषि क्षेत्रीय अधिकारी), सुजाता हजारे ( कृषि सहाय्य) यांना भिमा आदर्श कृषि विस्तारक पुरस्कार देण्यात आला. नामदेव सितापे (रा. कोथळी), प्रशांत चंदोबा (रा. दानोळी), सचिन उदाळे ( रा. वाघवे) व विनोद बेर्डे (रा. उचत) यांना शेतीभूषण पुरस्कार दिला. तसेच, शिवाजी पाटील (रा. कोनवडे), राजेंद्र बन्ने (रा. तारदाळ), वैजू कुटे (रा. किणी), दिलीप चौगले (रा. राशिवडे), सदानंद जाधव (रा. धनगरमळा), कुलदिप खोत (रा. चांदेकरवाडी), महादेव पाटील (रा. वाकरे), बजरंग सुतार (रा. करडवाडी), दिपक शेती (राधानगरी) व अभयसिंह पाटील (रा. खानापूर) यांना भिमा आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.