
रांगोळीत जल जीवन योजनेचे भूमीपूजन
ich301.jpg
79094
रांगोळी ः येथे जल जीवन मिशन योजनेचा पायाखोदाई कार्यक्रम आमदार प्रकाश आवाडे, राजू आवळे यांच्या उपस्थितीत झाला.
रांगोळीत जल जीवन योजनेचे भूमिपूजन
रांगोळी, ता. ३१ ः जल जीवन मिशन योजनेच्या मंजुरीमुळे ग्रामीण भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. रांगोळी (ता. हातकणंगले) येथील जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन व पायाखोदाईप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजू आवळे होते.
गावाच्या विकासासाठी गट-तट न पाहता ५० लाखांचा निधी दिला आहे. मराठा भवनसाठी दहा लाखांचा निधी दिला जाईल. पाणी योजना कशी दर्जेदार होईल याकडे लक्ष द्या, असे आमदार आवळे यांनी सांगितले. प्रास्ताविक सरपंच संगीता नरदे यांनी केले. पुढील पाच वर्षांत सर्व सदस्यांना एकत्र करून गावच्या विकासासाठी काम करण्याची त्यांनी ग्वाही दिली. हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, उपसरपंच सविता मोरे, रांगोळी विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष तानाजी सादळे, आर. डी. सादळे, सुभाष नरदे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी जंगले, लखन बेनाडे, शिवाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
-----------------------
श्रेयवाद रंगला
योजना मंजुरीच्या श्रेयवादावरून आमदार आवाडे व आवळे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला. महाविकास आघाडीच्या काळात योजना मंजूर झाल्याचे आवळे यांनी सांगितले. आवाडे यांनी भाजप व शिंदे गटाच्या सरकारने योजना मंजूर केल्याची कागदपत्रे सादर केली. या श्रेयवादाची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.