
नायगावकरांचा उद्या सत्कार
55613
अशोक नायगावकर यांचा
उद्या अमृतमहोत्सवी सत्कार
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभतर्फे बुधवारी (ता.१) प्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार असून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार होईल. आमदार सतेज पाटील, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. मराठी रसिकांच्या मनावर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे कवी म्हणून नायगावकर सर्वपरिचित आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य सभेने केले आहे.
--------------
79112
कोल्हापूर : साक्षी बरगाले यांचा पुरस्काराने गौरव करताना माजी खासदार निवेदिता माने. शेजारी गणेश पाखरे, श्रीनिवास कोंडूत्ती.
साक्षी बरगाले यांना पुरस्कार
कोल्हापूर : खिद्रापूर येथील पाखरे जी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पद्मावती भोजनालयाच्या साक्षी बरगाले यांचा महिलारत्न गौरव पुरस्काराने सन्मान झाला. माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पोलिस अधिकारी तानाजी सावंत, अमोल कोळेकर, वृषाली पाटील, अरविंद कारची, अब्दुल पटेल, राजेंद्र देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. संजय घोडावत ॲकॅडमीचे संस्थापक संचालक श्रीनिवास कोडूत्ती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे अध्यक्ष गणेश पाखरे यांनी आभार मानले.
--------------
वाढीव पेन्शनसाठी
ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ईपीएस ९५ च्या वाढीव पेन्शनसाठी हायरवेजीस पेन्शनरांचे अर्ज श्रमिक संघाने भविष्यनिर्वाह कार्यालयात जमा केले आहेत. या कार्यालयाने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन केली असून त्यामधूनच अर्ज करणे आवश्यक आहे. मुदतीत आपला वाढीव पेन्शनहक्क नोंदवण्यासाठी फॉर्म भरण्याची सुरवात ऑनलाईन महा ई सेवा केंद्रात सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी पीपीओ संपूर्ण नंबर, आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, जन्मतारीख, २०१४ पूर्वी वाढीव पेन्शनसाठी केलेला व पेन्शन ऑफिसने नाकारलेल्या अर्जाची प्रत आवश्यक असून तत्काळ ऑनलाईन फॉर्म भरावेत, असे आवाहन अनंत कुलकर्णी यांनी केले आहे. दरम्यान, सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले पेन्शनर ज्यांच्या आस्थापना कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के अधिक संस्थेचे बारा टक्के अशी एकत्रित रक्कम भविष्यनिर्वाह निधीकडे जमा करत होत्या तेथील सर्व कर्मचारी हे अर्ज भरू शकतात.