महापालिका घेणार तयार डांबरी खडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका घेणार तयार डांबरी खडी
महापालिका घेणार तयार डांबरी खडी

महापालिका घेणार तयार डांबरी खडी

sakal_logo
By

महापालिका घेणार
तयार डांबरी खडी
४०० टनाची निविदा; विभागीय कार्यालयांना समान वाटप
कोल्हापूर, ता. ३० : डांबरी प्रकल्प सुरू करण्यास वेळ जाणार असल्याने महापालिका पॅचवर्कसाठी बारीक डांबरी खडीचा माल (प्रीमिक्स) तयार घेणार आहे. ४०० टन हा माल खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच वर्कऑर्डर दिली जाणार आहे.
महापालिकेचा डांबरी प्रकल्प बंद असल्याने पॅचवर्कसाठीही निविदा काढल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातून वेळ जात होता; तसेच पॅचवर्कची गुणवत्ताही राखली जाण्याची शंका होती. रस्त्यासाठी निधी मिळत नाही व दुसरीकडे खड्ड्यांमुळे नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी थांबवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पहिल्या टप्प्यात मोठ्या खडीचे पॅचवर्क केले. डांबरी प्रकल्प सुरू झाला, तर त्यातून बारीक खडीचा माल तयार करून पॅचवर्क करण्याचे नियोजन होते. पण हा प्रकल्प होत नसल्याने पवडी विभागाने बारीक खडीचा तयार डांबरी माल घ्यायचे ठरवले. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. २६ लाखांची निविदा असून त्याची वर्कऑर्डर लवकरच दिली जाणार आहे.
वर्कऑर्डरनंतर हा माल चार विभागीय कार्यालयांना प्रत्येकी १०० टन असा समान वाटप केला जाणार आहे. त्यातून त्‍या विभागीय कार्यालयाने आपापल्या क्षेत्रातील पॅचवर्कची कामे पूर्ण करायची आहेत.
---------------
चौकट
डांबर खरेदीचीही प्रक्रिया
डांबर प्रकल्प सुरू नसल्याने महापालिकेने डांबर खरेदी केली नव्हती. आता पवडी कर्मचाऱ्यांतर्फे पॅचवर्क करायचे असल्याने डांबर खरेदीची प्रक्रिया राबवली आहे. प्रकल्पातील डांबर साठवणुकीच्या टाकीत डांबर घेतले जाणार आहे. त्यातून गरज लागेल त्याप्रमाणे बॅरेल भरून डांबर घेता येणार आहे. त्यामुळे डांबर नाही, पॅचवर्क कसे करायचे असे विभागीय कार्यालयांना सांगता येणार नाही.
-------------
कोट
बारीक डांबरी खडी उपलब्ध करून पॅचवर्क चांगले व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यातून प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून पॅचवर्क केले जाणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता