रत्नमाला घाळी : गडहिंग्लजकरांची माऊली

रत्नमाला घाळी : गडहिंग्लजकरांची माऊली

GAD304.JPG :
79289
श्रीमती रत्नमाला घाळी
-----------------------------------------
गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा व विविध सामाजिक संस्थांशी जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्‍या श्रीमती रत्नमाला घाळी (वय ९०) यांचे निधन झाले. त्यानिमित्त...
- प्रा. शिवाजीराव भुकेले, गडहिंग्लज
---------------------------------------

रत्नमाला घाळी :
गडहिंग्लजकरांची माऊली

श्रीमती घाळी यांचा जन्म हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील कंगोरी कुटुंबियात २५ डिसेंबर १९३१ रोजी झाला. वडिलांचे शुद्ध सात्विक संस्कार बालपणापासून आचरणात आणण्याचे काम त्यांनी केले. माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची सावली बनूनच त्यांना त्यांनी साथ दिली. १९८७ मध्ये घाळी यांच्या निधनानंतर विद्या प्रसारक मंडळाची धुरा अनेक वरिष्ठांच्या आग्रहाने त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. अखेरपर्यंत विद्या प्रसारक मंडळाचा वटवृक्ष बहारत ठेवण्याचे काम केले.
त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळपर्यंत सत्यत्वाच्या आराधनेकडे पाहिले तर कोणत्याही असत्य गोष्टीला त्यांनी कधीच होकार दिला नाही. राहणी अत्यंत साधी असली तरी परिपूर्णतेची एक तेजस्विता त्यांच्या चेहऱ्‍यावर झळकत असे. (कै.) घाळी यांच्यानंतर त्यांनी विद्या प्रसारक मंडळाला नवीन शैक्षणिक दृष्टी दिली. त्यांच्या सोबतच त्यांचे पुतणे डॉ. सतीश घाळी यांच्या नेतृत्वाखाली संचालकांनी या संस्थेची शैक्षणिक घोडदौड कायम सुरु ठेवली आहे.
वयाच्या नव्वदीनंतरही वाचन, मनन, चिंतन आणि निदीध्यासन या चतु:सुत्रीचा त्यांनी अवलंब केला. आजअखेर गांधीनगरमधील बंगल्यावर आलेला कोणताही अतिथी विमुख परत गेला नाही. श्रीमती घाळींनी राजकारणात कधीच सक्रीय नव्हत्या. विद्या प्रसारक मंडळ हेच आपले अपत्य आणि या अपत्याला प्रेमाने वाढवणे हीच आपली आयुष्यभराची संपत्ती असे मानणारी ही माऊली होती. येणाऱ्‍या व्यक्तीला त्याची जात, धर्म काही न विचारता आधार देण्याचे काम त्या करत असत. जिवंतपणी आपल्या कायेला कैलास बनवून शिवभावे जीवसेवा करण्याचे काम या शिवत्वरुपी माऊलीने केले. या माऊलीला श्रद्धांजली वाहताना एवढेच म्हणुया... ‘करुन जावे बरेच काही...दुनियेतून या जाताना...गहिवर यावा जगास साऱ्‍या...निरोप शेवटी देताना !’
--------------
* निष्काम भावनेतून सेवा
श्रीमदभवतगीतेत वर्णन केलेल्या निष्ठाम कर्मयोग्याप्रमाणे अत्यंत निष्काम भावनेने समाजाचेही त्या सेवा करीत होत्या. तपस्विता हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आपल्या तपस्वी वाणीने व मनमोकळ्या स्वभावाने येणाऱ्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या आपल्या माऊली वाटत. ‘तू संसार श्रांतांची सावली ! अनाथ जीवांची माऊली ! आमुते कीर प्रसवली ! तुझीच कृपा !’ या संत ज्ञानेश्‍वरांच्या वचनाप्रमाणे विद्या प्रसारक मंडळातील प्रत्येकाला त्या आपल्या माऊली वाटत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com