कनवा काव्य महोत्सव

कनवा काव्य महोत्सव

काव्य महोत्सव करंडक काव्यफुले संघाकडे
करवीरनगर वाचन मंदिर, गजेंद्र प्रतिष्ठानतर्फे रंगला महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः येथील करवीरनगर वाचन मंदिर, गजेंद्र प्रतिष्ठान आयोजित काव्य मैफल महोत्सवात काव्यफुले संघ विजेता ठरला. या संघामध्ये पूजा दिवाण, प्रतिराज मांगोलीकर, डॉ. इला माटे, मीनल कुलकर्णी यांचा समावेश होता. त्यांना रोख दहा हजार रूपये आणि फिरता करंडक देण्यात आला.
महोत्सवात दुसरा क्रमांक वरेरकर नाट्य संघाने पटकावला. या संघात वृषाली मराठे, हर्षदा सुंठणकर, विद्या देशपांडे, भावना दातार यांचा समावेश होता. या संघाला सात हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. तिसरा क्रमांक कविता फक्त कविता संघाने मिळवला. प्रविण रायबागकर, प्रा. शशिकांत शिंदे, रमा दिक्षित, डॉ. संयुक्ता कुलकर्णी यांच्या या संघाला पाच हजारांचे पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून संयोगिता महाजन यांना तर उत्कृष्ट कवितेसाठी मीनल कुलकर्णी यांना पारितोषिके देण्यात आली. गीतांजली तुपे, प्रियांका पोतेकर, मयुर कांबळे, तृप्ती केसरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
दरम्यान, कविता म्हणजे कल्पनेचा, वास्तवाचा एक अद्भुत नमुना असतो. त्यामुळे ती प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असते, असे यावेळी गजेंद्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले. डॉ. नंदकुमार जोशी, डॉ. आशुतोष देशपांडे, अभिजीत भोसले, डॉ. संजीवना तोफखाने, अश्विनी वळीवडेकर, उदय सांगवडेकर, प्रा. डॉ. रमेश जाधव, मंगेश राव, श्याम कारंजकर, मनीषा वाडीकर आदी उपस्थित होते. नीलांबरी कुलकर्णी, चंद्रशेखर फडणीस, पी. डी. कुलकर्णी यांनी परीक्षण केले. ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com