
पत्रके आहेत ही पत्रके
कमला कॉलेजमध्ये फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा
कोल्हापूर : कमला कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत गृहशास्त्र विभागातर्फे ‘फॅब्रिक डेकोरेशन-फॅब्रिक पेंटिंग’ यावर कार्यशाळा झाली.
प्रा. डॉ. सुप्रिया चौगुले यांनी उद्घाटन केले. प्रथम सत्रात ‘स्टेन्सिल पेंटिंग’ यावर प्रा. आदर्श चव्हाण यांनी स्टेन्सिल बनवण्यापासून ते स्टेन्सिल पेंटिंग प्रकारापर्यंत व्यवस्थित प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात वारली आर्टिस्ट एल. एम. गाडगे यांनी ‘वारली पेंटिंग’चे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात ‘मधुबनी पेंटिंग’ यावर मेघना महेश यांनीही मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा लिड कॉलेज समन्वयक व गृहशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा साठे, कार्यशाळा समन्वयक प्रा. अश्विनी कुंभार, प्रा. तृप्ती माने, प्रा. स्मिता कोळेकर, प्रा. वैदेही भागवत या सर्वांच्या सहकार्याने पार पडली. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण झाले.
...
कमला कॉलेजमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर : कमला कॉलेजमधील क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय, शिवाजी युनिव्हर्सिटी कॉलेज लायब्ररीयन असोसिएशनतर्फे तीन फेब्रुवारीला ‘फ्युचर ॲकॅडमीक लायब्ररीज्’ यावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. केरळ डिजिटल युनिव्हर्सिटी येथील ग्रंथपाल डॉ. गोपाकुमार व्ही. यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले आहे. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर नॉलेज रिसोर्स सेंटर शिवाजी विद्यापीठचे प्रभारी ग्रंथपाल धनंजय सुतार यांना निमंत्रित केले आहे. चर्चासत्रास सांगली, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, पुणे, मुंबई येथील महाविद्यालायातील प्राध्यापक, ग्रंथपाल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, ग्रंथपाल ऊर्मिला कदम, सुकला संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आढाव यांनी पत्रकाद्वारे दिली.