कॉपी करणाऱ्या १२ जणांना भरारी पथकाने पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉपी करणाऱ्या १२ जणांना भरारी पथकाने पकडले
कॉपी करणाऱ्या १२ जणांना भरारी पथकाने पकडले

कॉपी करणाऱ्या १२ जणांना भरारी पथकाने पकडले

sakal_logo
By

विद्यापीठ परीक्षेत कॉपी करताना
आणखी १२ जणांना पकडले

कोल्हापूर, ता. ३१ ःशिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत मंगळवारी कॉपी (गैरप्रकार) करणाऱ्या १२ जणांना भरारी पथकांनी आज पकडले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत या पथकांनी कारवाई केली. काल सोमवारी या पथकांनी कॉपी करणाऱ्या १८ जणांवर कारवाई केली होती.
बी. कॉम., बी. एस्सी., बी. ए., बी. कॉम. बँक मॅनेजमेंट, बी. एस्सी. ॲनिमेशन अशा विविध १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज झाल्या. त्यात कॉपी करणाऱ्या १२ परीक्षार्थींना विद्यापीठाच्या भरारी पथकांनी पकडले. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीतर्फे नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पाच अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाईन जाहीर केले. त्यात बी. व्होक. टुरिझम अँड सर्व्हिस इंडस्ट्रीज, रिटेल मॅनेजमेंट अँड आयटी., बी. एस्सी. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग अँड मँनेजमेंट, ॲग्रीकल्चर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.