दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ

दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ

79910
बातमीचे कात्रण
लोगो-
‘सकाळ’ बातमीचा परिणाम

दुधाळ जनावरांच्या
खरेदी किमतीत वाढ
---
गायीसाठी ७०, तर म्हशीसाठी ८० हजार मिळणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १ : राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांच्या खरेदी किमतीत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार आता गायीसाठी ७०, तर म्हशीसाठी ८० हजार रुपये खरेदी किंमत राहणार आहे. ही राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांत राबविण्यास मान्यता देण्यात आली. अनुदान वाढ व सर्वसाधारण गटासाठी योजना लागू करण्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. जिल्‍हा परिषदेनेही याबाबतचे ठराव केले होते. त्याला या निर्णयाने यश आले आहे.
यापूर्वी दुधाळ गायीची खरेदी किंमत ४० हजार होती. यात बदल करून ती ७० हजार रुपये करण्यात आली. म्हशीची किंमत ४० हजारांवरून ८० हजार रुपये करण्यात आली. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेंतर्गत सहा किंवा चार किंवा दोन दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना केवळ दोन दुधाळ देशी किंवा संकरित गायी किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करण्यात येणार आहे. हे अनुदान देत असताना गोठा बांधकाम, कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा, खाद्य साठवणूक शेड बांधकाम या बाबींसाठी देय असलेले अनुदान रद्द केले आहे.
दुधाळ जनावरांच्या किमतीस अनुसरून तीन वर्षांसाठी विमा उतरविणे बंधनकारक आहे. यातील शासनाच्या हिश्‍श्‍यानुसारची रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायविषयक एकदिवसीय प्रशिक्षणासाठी प्रतिलाभार्थी ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनांची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षात करण्यात येईल.
------------
चौकट
पाठपुराव्याला यश
दरम्यान, याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यास अनुसरून जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी वेगवेगळ्या समित्यांचे ठराव शासनाला पाठविण्याच्या सूचना केल्या. जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी अशा प्रकारच्या योजनेसाठी शासनाकडे सचिवस्‍तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com