सोनोग्राफी मशिनच नोंद नाहीत...

सोनोग्राफी मशिनच नोंद नाहीत...

लोगो- बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण
-
अनधीकृत सोनोग्राफी मशिनमुळेच खतपाणी
शोध घेण्याचे आरोग्‍य, पोलिस विभागासमोर आव्हान; नियम कडक पण नोंदणीवाल्यांसाठीच

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : सोनोग्राफी मशिन घ्यायचे असल्यास कोटेशनपासून परवानगीपर्यंत नियमांची यादी असते. त्यांच्या सोनोग्राफींचे रोज संकेतस्थळावर अपडेट द्यावे लागतात. मात्र, जे सोनोग्राफी मशिन नोंदच नाहीत त्यांच्याकडून सर्वच नियम धाब्यावर बसविले जातात. नेमके हेच कारण बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला खतपाणी घालत आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्या सोनोग्राफी मशिनचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य आणि पोलिस विभागासमोर आहे.
नुकताच राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर छापेमारी झाली. आजपर्यंत तब्बल पंधरा जणांची नावे निष्पन्न झाली. मात्र, खऱ्या सूत्रधाराने आणलेले सोनोग्राफी मशिन नेमके कोठून आणले हा मुद्दा महत्त्‍वाचा ठरत आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी नोंदणी नसलेले सोनोग्राफी मशिन वापरले जात असल्याचे आजपर्यंत अनेकवेळा सिद्ध झाले आहे. मात्र, त्याचाच शोध घेण्यात आरोग्य विभाग आणि पोलिस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. सोनोग्राफी मशिन तयार करणाऱ्यांवर, विक्री करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रोखणे अशक्य आहे.
दिल्ली येथील एका प्रदर्शनातून मुंबईतील एजंटामार्फत कोल्हापुरात मशिनची विक्री झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच परराज्यातून बंद असलेले मशिन कोल्हापुरात आणून त्याचा वापर केल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्या सोनोग्राफी मशिनचा शोध घेण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेसमोर आहे.
--
चौकट
काय आहेत नियम?
सोनोग्राफी मशिन खरेदी करण्यापूर्वी तयार करणाऱ्या अधिकृत कंपनीचे कोटेशन जोडून ‘पीसीपीएनडीटी’ समितीकडून परवानगी घ्यावी लागते. रोजच्या रोज त्यांच्याकडील सोनोग्राफीची आकडेवारी, रुग्णाचे नाव, पत्ता यांची माहिती संकेतस्थळावर द्यावी लागते. महिन्यातून एकदा ‘फिजिकल’ आणि ‘ऑनलाईन’ अहवाल द्यावा लागतो. यातून बेकायदेशीर सोनोग्राफी होणे शक्यतो अशक्य आहे.
--
चौकट
बेकायदेशीर मशिन कोठे मिळू शकते ?
ऑनलाईनद्वारे खरेदी होऊ शकते
असेंम्ब्ली पद्धतीने तयार होऊ शकते
ज्यांनी प्रॅक्टीस बंद केले त्यांच्याकडील मशिनचा वापर
परराज्यातून खरेदी करून आणलेले मशिन
परराज्यातील वैद्यकीय प्रदर्शनातून थेट खरेदी
--
कोट
जिल्ह्यात ११० रेडिओलॉजिस्ट आणि २५० गायनोलॉजिस्ट यांच्याकडे सोनोग्राफी मशिन आहेत. त्यांच्या नोंदी रोजच्यारोज होत आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत, जे डॉक्टर नाहीत त्यांच्याकडील सोनोग्राफी मशिनचा शोध घेतला तरच बेकायदेशीर गर्भलिंग निदान बंद होईल. त्यामुळे अशा मशिनचा शोध घेण्यासाठी आमचे असोसिएशनही पोलिस आणि आरोग्य विभागाला सहकार्य करेल.
-डॉ. स्वेनील शहा, अध्यक्ष, डेक्कन महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट ॲण्ड इमेज असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com