आपटेनगरातील चोरी उघडकीस एकास अटक

आपटेनगरातील चोरी उघडकीस एकास अटक

80100

आपटेनगरातील चोरी उघडकीस
एकास अटक; पोलिसांकडून लोखंडी बार जप्त

कोल्हापूर, ता. २ ः आपटेनगर येथून काल चोरीस गेलेले लोखंडी बार जप्त करून करवीर पोलिसांनी चोरट्याला आज अटक केली. साहिल राज पाटील (वय २२. रा. मोतीनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे, तर दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. साहिलला आज न्यायालयासमोर हजर केले असता उद्या(ता.३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अल्पवयीन मुलास सुधारगृहात पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की आपटेनगर येथे पोकलॅण्ड गॅरेजसाठी आणलेले लोखंडी बार चोरीस गेल्याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या चोरीच्या अनुषंगाने नूतन पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी मोरेवाडी, आर. के. नगर, पाचगाव, कळंबा व जिवबानाना जाधव पार्क या परिसरात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, योगेश शिंदे व अमोल चव्हाण हे कळंबा रिंगरोडने वाशीनाक्याकडे गस्त घालत होते. त्यावेळी दुर्वांकुर सांस्कृतिक भवनसमोर दोन तरुण विना नंबरप्लेटच्या मोपेडवरून दोन लोखंडी मोठे बार घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांना थांबविण्याच्या इशारा देताच ते मोपेडसह पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यांना मोपेडसह ताब्यात घेतले. तेथे त्यांनी आपटेनगरातील चोरीची कबुली दिली.
चोरट्याने आपटेनगर येथे एका घरासमोर बाहेर गेटजवळ ६ लोखंडी ‘एच’ बार ठेवले होते. ते दोघांनी चोरून दुर्वांकुर सांस्कृतिक भवनसमोर रोडच्या पलीकडे मोकळ्या माळावर लपवून ठेवले होते. त्यातील २ लोखंडी बार हे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. उर्वरित ४ लोखंडी बार लपविल्याचे दाखविले. त्यानुसार पोलिसांनी तेही जप्त केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com