परीक्षेच्या कामकाजातील शिक्षकांची निवडणूक नियुक्ती रद्द ः जयंत आसगावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षेच्या कामकाजातील शिक्षकांची निवडणूक नियुक्ती रद्द ः जयंत आसगावकर
परीक्षेच्या कामकाजातील शिक्षकांची निवडणूक नियुक्ती रद्द ः जयंत आसगावकर

परीक्षेच्या कामकाजातील शिक्षकांची निवडणूक नियुक्ती रद्द ः जयंत आसगावकर

sakal_logo
By

80494
....

परीक्षेच्या कामातील शिक्षकांच्या
निवडणूक नियुक्त्या रद्द

आमदार जयंत आसगावकर यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ ः कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. जे शिक्षक परीक्षेच्या कामकाजात सहभागी आहेत, अशा शिक्षकांच्या निवडणुकीतील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी दिली. शैक्षणिक व्यासपीठच्या आज झालेल्या सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते.
विविध परीक्षांच्या काळातच कुंभी सहकारी कारखान्याची निवडणूक रविवारी (ता.१२) होणार आहे. या कामाबाबत कागल, पन्हाळा, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील व कोल्हापूर शहरातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना नियुक्ती आदेश देण्यात आला होता. रविवारी (ता.१२) शिष्यवृत्ती परीक्षा असल्याने तसेच आगामी १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेची कामे असल्याने शिक्षकांना निवडणुकीचे काम करणे अशक्य होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. शैक्षणिक व्यासपीठाकडे याबाबत असंख्य तक्रारी आल्या होत्या. या प्रश्नासंबंधी शैक्षणिक व्यासपीठाने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना भेटून या प्रश्नाची माहिती दिली. आमदार आसगावकर यांनी त्वरित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरचे आदेश रद्द करावेत, अशी विनंती केली होती. आज विद्या भवन येथे शैक्षणिक व्यासपीठाने आयोजित केलेल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आमदार आसगावकर यांनी सांगितला. यामध्ये परीक्षांचे कामकाज असणाऱ्या शिक्षकांची निवडणूक नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सार्वत्रिक निवडणुका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामाशिवाय सहकार क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीचे काम शिक्षक, मुख्याध्यापक यांना देवू नये. म्हणून फेब्रुवारी महिन्यातच या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा एक दिवस बंद ठेवून शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आमदार आसगावकर यांनी घोषित केला.
या वेळी बी. जी. बोराडे, दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, बाबा पाटील, इरफान अन्सारी, प्रा. सी. एम. गायकवाड, उदय पाटील, सुधाकर निर्मळे, अरुण मुजुमदार, सुधाकर सावंत, सुदेश जाधव, शिवाजी लोंडे, वर्षा पाटील, विजयमाला सुर्यवंशी आदी उपस्थित होते. मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले.