मराठी विभागात माजी विद्यार्थी मेळावा

मराठी विभागात माजी विद्यार्थी मेळावा

विद्यापीठाच्या मराठी विभागात
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

कोल्हापूर ः ‘शिक्षक हे परिपूर्ण माणूस घडविण्याचे कार्य करतात’, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठात मराठी विभागातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. १९९६-९७, ९७-९८ या वर्षांतील माजी विद्यार्थी यावेळी एकत्र आले होते. डॉ. शिंदे म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात भाषा, साहित्य आणि समाज या संदर्भातील परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या वाङ्‍मयीन संस्कृतीत मराठी विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’ यावेळी प्राचार्य अशोक बाबर, प्रा. डॉ. गिरीश मोरे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. रणधीर शिंदे, लेखक अनुवादक सोनाली नवांगुळ, डॉ. हिमांशू स्मार्त, चंद्रशेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांमार्फत डॉ. हिमांशू स्मार्त यांना एशियाटिक सोसायटीची अरुण टिकेकर फेलोशिप मिळाल्याबद्दल, तसेच सोनाली नवांगुळ यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. दिलीप जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश हुलेनवर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. प्रा. बाळासाहेब माने यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com