केवळ गुणांकरिता नव्हे, तर परिपूर्ण शिक्षण घ्या

केवळ गुणांकरिता नव्हे, तर परिपूर्ण शिक्षण घ्या

फोटो (KOP23L80700)
............................................................

केवळ गुणांसाठी नव्हे,
तर परिपूर्ण शिक्षण घ्या

तवडकर; कमला कॉलेजमध्‍ये राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर, ता. ५ : केवळ गुण मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊ नये, तर त्यांनी परिपूर्ण शिक्षण घ्यावे. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे ग्रंथ वाचनातून पर्यायाने ग्रंथालयांशी ऋणानुबंध जोडल्यामुळे विकसित होते, असे मत गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.
येथील कमला कॉलेजमध्ये ‘भविष्यातील शैक्षणिक ग्रंथालये’ याविषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, तर केरला डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सेस टेक्नॉलॉजी अँड इनोवेशनचे प्रमुख डॉ. गोपाकुमार प्रमुख उपस्थित होते. तवडकर म्हणाले, ‘‘भाविष्यातील विद्यार्थी आणि ग्रंथालय यांचे बदलते स्वरूप विचारात घ्यावे. वाचकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.’’ डॉ. गोपाकुमार यांनी ग्रंथालयामध्ये येऊ घातलेले नवनवीन बदल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव प्राजक्त पाटील, शिवाजी विद्यापीठ कॉलेज लायब्ररीयन्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र आढाव, ग्रंथपाल उर्मिला कदम, डॉ. अनिल घस्ते, सुजय पाटील, वर्षा साठे, ज्योती गावडे, प्रताप रंगापुरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा सादर केला. नीता धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा मेंदर्गी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com