
साक्षी जाधवचे यश
ich53.jpg
80548
साक्षी जाधवचे यश
इचलकरंजी : सह्याद्री तायक्वाँदो अँड स्पोर्टस् ॲकॅडमी रूकडी माणगावची खेळाडू साक्षी जाधव हिने जळगाव येथे झालेल्या ३२ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तिची विशाखापट्टणम येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नीलेश परीट, प्रकाश निराळे, सुशांत माने, आश्लेषा परीट, सारंग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------
ich54.jpg
80549
इचलकरंजी : माई बाल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट दिली.
माई बाल विद्या मंदिरची क्षेत्रभेट
इचलकरंजी : माई बाल विद्यामंदिरमधील चौथीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत डिकेटीई व गर्ल्स हायस्कूलच्या अटल लॅबला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन मिळावे, तसेच डिजिटल युगातील तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानात कसा होतो? हे विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी ही भेट दिली होती. डीकेटीईतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे विज्ञानाच्या डिजिटल साहित्याची व उपकरणांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. निर्मला ऐतवडे, मुख्याध्यापिका शैला कांबरे, प्राचार्या वरदा उपाध्ये, डी. एस. पाटील उपस्थित होते.
-----------------
ich55.jpg
80550
उमेश वंजारे, अंकुश वंजारे
टाकळीवाडीतील भावांची सैन्यात निवड
इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील उमेश वंजारे (वय २०) व अंकुश वंजारे (वय २१) हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांची एकाचवेळी भारतीय सेनेत निवड झाली आहे. त्यांना लहानपणापासूनच देशसेवा करण्याची प्रचंड इच्छा शक्ती होती. शालेय जीवनात धावणे व इतर खेळांत त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. एकाच वेळी दोघे सख्खे भाऊ भारतीय सेनेत भरती झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना रमेश निर्मळे, सुभेदार केंदबा कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
---------------------
मोफत संगणक प्रशिक्षण
इचलकरंजी : चांगुलपणाची चळवळ या माध्यमातून ओंकारेश्वर्य एज्युकेशन ट्रस्टतर्फे लॉर्ड जिव्हेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, शहापूर येथे महिला, पुरुष, मुले, मुलींसाठी मोफत कॉम्प्युटरचे कोर्सेस सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये टेली, डाटा एन्ट्री, अकाउंटिंग, तर महिलांसाठी गारमेंट प्रशिक्षण, फॅशन डिझाइनिंग, ब्यूटीपार्लर, बांबू आर्ट, ज्वेलरी मेकिंगचे प्रक्षिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डी. एस. कुंभार, तहसीलदार, मिरज व संजय मुळे लेखापरीक्षक अधिकारी यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन वृषाली साळी यांनी केले.