मायाक्का चिंचली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायाक्का चिंचली
मायाक्का चिंचली

मायाक्का चिंचली

sakal_logo
By

nip0523
80625
मायाक्का चिंचली : येथे भाविकांची झालेली गर्दी.

मायक्का चिंचली यात्रेला प्रारंभ

भाविकांची पहिल्या दिवसापासून गर्दी

रायबाग, ता. ५ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचलीच्या मायाक्का देवीच्या यात्रेला रविवारी (ता. ५) प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासूनच चिंचलीत भक्तीमय वातावरण झाले आहे. राज्यासह परराज्यातून भाविक चिंचलीच्या चारही बाजूने दाखल होत आहेत. सर्व रस्त्यांवर वाहनांच्या रांगा आतापासूनच दिसत आहेत.
१४ फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. गुरुवारी (ता. ९) मुख्य नैवेद्य (बोणी) व पालखी होणार आहे. या बरोबर अन्य धार्मिक कार्य चालणार आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट, नगर पंचायत, आरोग्य खात्यासह अन्य सरकारी विभागाचे अधिकारी तयारी करत आहेत. येणाऱ्या भक्तांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातून भाविकांना ने-आण करण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. याबरोबर भाविक खासगी चारचाकी गाड्याने मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी कुडची नगर परिषदेच्या वतीने कुडचीत कृष्णेच्या काठावर आंघोळी साठी खास शॉवरची व्यवस्था केली आहे. त्याबरोबर महिलांना कपडे बदलण्यासाठी तात्पुरते शेडही उभारले आहे. गुरुवारी मुख्य दिवस असल्याने येणाऱ्या भाविकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी आतापासून पोलिस बंदोबस्त तौनात केला आहे.