Thur, June 1, 2023

शरद पॉलिटेक्निकमध्ये कार्यशाळा
शरद पॉलिटेक्निकमध्ये कार्यशाळा
Published on : 6 February 2023, 1:02 am
शरद पॉलिटेक्निकमध्ये कार्यशाळा
दानोळी ः यड्राव यथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्निकल व नॉनटेक्निकल स्टाफसाठी दोनदिवसीय पी. सी. क्लिनिक व पी. सी. आणि लॅपटॉप मेंटेनन्स, या विषयावर कार्यशाळा झाली. विविध महाविद्यालयांतून स्टाफ सहभागी झाला होता. एम.एस.बी.टी.ई. मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत कॉम्प्युटर हार्डवेअर, डिव्हायसेस, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टॉलेशन, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर-हार्डवेअर येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय शिकवले. कार्यशाळेचे संयोजन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य बी. एस. ताशिलदार, विभागप्रमुख प्रा. आर. एम. पाटील, सौ. ए. एस. पाटील, सौ. ए. बी. बेडक्याळे यांनी केले.