कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत व्यस्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी  क्रीडा स्‍पर्धेत व्यस्‍त
कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत व्यस्‍त

कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत व्यस्‍त

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत व्यस्‍त

नागरिकांची गर्दीही ओसरली; नियमित कामांचा उडाला बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : जिल्‍हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्‍पर्धा सुरू असल्याने सध्या कार्यालयात कर्मचारी शोधण्याची वेळ आली आहे. मुख्यालयात हजेरी लावली की कर्मचारी थेट मैदानाकडे कूच करत आहेत. तर काही कर्मचारी ना मुख्यालयात ना मैदानात, त्यांना शोधायचे कुठे, असा प्रश्‍‍न इतर कर्मचाऱ्यां‍ना पडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून असेच चित्र असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी जिल्‍हा परिषदेकडे पाठ फिरवली आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी जिल्‍हा परिषद क्रीडा स्‍पर्धा सुरू आहेत. गेले आठवडाभर स्‍पर्धांची धामधूम सुरू आहे. प्रत्यक्ष खेळणाऱ्यां‍पेक्षा बघणाऱ्यां‍चीच संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे. हा आठवडाही स्‍पर्धेचाच असल्याने मुख्यालयात कामासाठी येणाऱ्या‍ लोकांनीही पाठ फिरवली आहे. अधूनमधून काही माजी सदस्य मुख्यालयात येऊन निधीबाबत चौकशी करत आहेत. अधिकारीही सध्या विभागाच्या योजनांच्या जुळवाजुळवीत आहेत. किती निधी मिळणार, हा निधी वेळेत कसा खर्च करायचा, कोणत्या योजना घ्यायच्या, निविदा प्रक्रिया कशी राबवायची याबाबत सतत बैठका सुरु आहेत. क्रीडा स्‍पर्धेसाठी बहुतांश कर्मचारी उपस्‍थित राहत असल्याने नियमित कामांचाही बोजवारा उडाला आहे. किमान दैनंदिन पत्रव्यवहार स्‍वीकारण्यासाठी तरी मनुष्यबळ उपलब्‍ध व्‍हावे, अशी मागणी केली जात आहे.
...