निधी वाटपाचे सूत्र निश्‍चित

निधी वाटपाचे सूत्र निश्‍चित

जिल्‍हा नियोजन मंडळाच्या
निधी वाटपाचे सूत्र निश्‍चित

भाजप - शिंदे गटाला प्रत्येकी ४० तर विरोधी पक्षांना १० टक्के निधी


सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ६ : जिल्‍हा नियोजन मंडळातून देण्यात येणाऱ्या‍ निधीचे सूत्र ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे. या सूत्रानुसार भाजप ४० टक्के, शिंदे गट ४० तर पालकमंत्री १० व विरोधी पक्ष यांना १० टक्के निधी विकासकामांसाठी उपलब्‍ध करून दिला जाणार आहे. ठरलेल्या सूत्रानुसार निधी मागणीची शिफारस पत्रे लोकप्रतिनिधींकडून देण्यास सुरुवात झाली आहे. सध्या खासदारांच्या शिफारसपत्रांवर निधी वितरण सुरू आहे.

मागील दोन महिन्यांपासून निधी वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, कोणत्या पक्षाला किती निधी द्यायचा, यावर एकमत झाले नाही. त्यामुळे निधी वाटपाचे भिजत घोंगडे पडले होते. आता तर मार्चअखेरला केवळ दीड महिना राहिल्याने निधी वाटपासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामस्‍थ आणि कंत्राटदारांकडून दबाव वाढू लागला आहे. हा विषय अधिक चिघळू नये यासाठी निधी वाटपाचे सूत्र ठरवण्यात आल्याचे नियोजन मंडळांच्या सदस्यांकडून सांगण्यात येत आहे. नवीन सूत्रानुसार भाजप व शिंदे गटाला समान म्‍हणजेच प्रत्येकी ४० टक्‍के निधी दिला जाणार आहे. तर पालकमंत्र्यांना १० टक्‍के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. विरोधकांसाठी १० टक्‍के निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी शिंदे गटाला जादा निधी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याला भाजपने आक्षेप घेतला. त्यामुळे निधीचे सूत्र बदलण्यात आले आहे. नवीन सूत्रानुसार सध्या खासदारांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. तर ठरावीक आमदारांनी शिफारस केलेल्या कामांची निविदा प्रक्रिया करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, विरोधकांना अजूनही निधीचे सूत्र देण्यात आलेले नाही. निधी वाटपावरून सध्या लोकप्रतिनिधींमध्ये मोठा असंतोष असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com