दलित वस्‍ती निधी वाटप प्रकरण न्यायालयात

दलित वस्‍ती निधी वाटप प्रकरण न्यायालयात

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

दलित वस्‍ती निधी वाटप प्रकरण भोवणार

उच्‍च न्यायालयात याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ६ : जिल्‍हा नियोजन मंडळाकडून देण्यात येणाऱ्या‍ दलित वस्‍तीच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्‍हा परिषदेने स्‍थगिती दिली आहे. याबाबतचा पत्रव्यवहार गट विकास अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना करण्यात आला आहे. या आधारे माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने कंत्राटदारास काम थांबवण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशालाच कंत्राटदार सचिन कोळी यांनी उच्‍च न्यायालयात आव्‍हान दिले आहे. यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते जिल्‍हा परिषदेपर्यंत सर्वांना या दाव्यात दाखल करुन घेतले आहे.

जिल्‍हा परिषदेने माणगाव येथील दलित वस्‍ती विकासासाठी निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर गावाने प्रशासकीय, तांत्रिक मान्यता घेऊन राज्य शासनाच्या पोर्टलवर निविदाही प्रसिध्‍द केली. यात सचिन कोळी यांची निविदा पात्र ठरल्यानंतर त्यांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. कोळी यांनी काम मिळाल्यानंतर तत्‍काळ ते पूर्ण करण्याचे नियोजन केले. सद्यस्‍थितीत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. असे असताना, अचानकच त्यांना काम स्‍थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुळात दलित वस्‍तीच्या काम वाटपाचे अधिकार जिल्‍हा परिषद समाजकल्याण समितीचे आहेत. या अधिकारावर अलीकडे अतिक्रमण होत आहे. आता तर मंजूर कामेच रद्द करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. या मनमानीला श्री. कोळी यांनी आव्‍हान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com