
गड-गोडसाखर जागा लिलाव
‘गोडसाखर’ जागा लिलाव स्थगित
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या जागेचा बुधवारी (ता.८) फेरलिलाव होणार होता. पण, लिलाव होणाऱ्या जागेबाबत हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीने संभ्रम उपस्थित केला असल्याने लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे पत्रक तहसीलदार दिनेश पारगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. हरळी खुर्द येथील गट नंबर ४३४/अ ची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून घेण्यात आली होती. त्यानंतर या जागेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, या जागेबाबत हरळी खुर्द ग्रामपंचायतीने निवेदन दिले आहे. यात जागेबाबत संभ्रम उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चित केलेली जागा बरोबर आहे का याची विचारणा भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे. त्यांच्याकडून जागेची पाहणी करून गट नंबर ४३४/अ की ४३४/ब/१ याबाबतचा अहवाल सादर करण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारी होणारी फेरलिलावाची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
....
916
सातवे : येथे आळोबानाथ वर्धापनदिनानिमित्त निघालेला पालखी सोहळा.
...
सातवेत आळोबानाथ वर्धापनदिनानिमित्त पालखी सोहळा
सातवेः येथे आळोबानाथ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.‘आळोबाच्या नावाने चांगभलं’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सकाळी आठ वाजल्यापासून संत ज्ञानेश्वर माऊली, संत सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. सोहळ्यामध्ये आटपाडी (जि. सांगली) येथून शंभर जणांचे खास वारकरी पथक आले होते. सेवागिरी पथकाचे जाधव महाराज प्रमुख होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरून स्वागत कमानी व प्रत्येक गल्लीमध्ये आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या. गावातील शेकडो महिला -पुरुष दिंडी सोहळ्यामध्ये सामील झाले होते. दिंडी सोहळ्यामध्ये सातवे हायस्कूल सातवे, विवेकानंद विद्यामंदिर, केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हत्ती, घोडे, उंट, रथ यांचाही मिरवणुकीत सहभाग होता. मिरवणुकीच्या शेवटी भगतसिंग चौकात भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ तसेच आटपाडी मंडळाच्या सर्व वारकरी -टाळकरी मंडळांनी प्रात्यक्षिके दाखवली.
.....
2930
यवलूज ःकन्या विद्यामंदिर शाळेस सिलिंग फॅन देताना इंद्रजित पाटील, संभाजी पाटील आदी.
...
यवलूज कन्या विद्यामंदिरकडे सिलिंग फॅन सुपूर्द
माजगाव : यवलूज (ता. पन्हाळा) येथील इंद्रजित संभाजी पाटील यांनी आपल्या दिवंगत पत्नी मंजुश्री पाटील यांच्या स्मरणार्थ कन्या विद्यामंदिर शाळेसाठी ९ सिलिंग फॅन देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. उच्चशिक्षित असलेले इंद्रजित व त्यांची पत्नी मंजुश्री हे एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. काही दिवसापूर्वीच मंजुश्री यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी कन्या विद्यामंदिर शाळेसाठी ९ सिलिंग फॅन शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चौगले यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी सरपंच अर्चना पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा परवीन मुल्लाणी, संभाजी पाटील, सर्जेराव गायकवाड, सागर कोळी, शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.