Wed, March 29, 2023

सामुदायिक दासनवमी
सामुदायिक दासनवमी
Published on : 6 February 2023, 6:13 am
80975
सामुदायिक दासनवमी,
पारायण उत्सवाला प्रारंभ
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि दासबोध अभ्यास मंडळातर्फे दासनवमी उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. दुपारी दोन ते सहा वेळेत श्री समर्थ रामदास रचित श्री दासबोध ग्रंथाचे सामुदायिक पारायण होणार असून, श्री दासबोध ग्रंथावर समर्थ भक्तांकडून मार्गदर्शन होणार आहे. बाहेर गावच्या भक्तांनी आपल्या घरातून अथवा सोयीच्या ठिकाणाहून श्री दासबोध पारायण करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल व कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी केले आहे. दासबोध अभ्यास मंडळाचे अप्पा पाटगावकर, कार्यवाह बाळासो पाटील आदींनी संयोजन केले आहे.