रविंद्रनाथ जोशी यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविंद्रनाथ जोशी यांना पुरस्कार
रविंद्रनाथ जोशी यांना पुरस्कार

रविंद्रनाथ जोशी यांना पुरस्कार

sakal_logo
By

80976

सु. रा. देशपांडे पुरस्कार
रविंद्रनाथ जोशी यांना प्रदान

कोल्हापूर, ता. ६ ः देश बांधणी होण्यासाठी समाजाची बांधणी करणे आवश्यक आहे. समाजामध्ये असणाऱ्या लहान मोठ्या घटकांमुळे समाजाची परिपुर्ण बांधणी होते. सु. रा. देशपांडे यांनी केलेले सामाजिक कार्य हे त्याचेच उदाहरण आहे, अशा भावना प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केल्या.
सु. रा. देशपांडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त देशपांडे फाउंडेशनतर्फे आज अक्षर दालनचे संस्थापक रवींद्रनाथ जोशी यांना पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, रवींद्रनाथ आणि गीतांजली जोशी या दांपत्याला रोख अकरा हजार रुपये आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, डॉ. सुनीलकुमार लवटे, सोनाली नवांगुळ, डॉ. रमेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ शिक्षक रा. तु. भगत, श्याम कुरळे, नाना पालकर आदींचे सत्कार झाले. डॉ. सागर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.