आंबोली घाट खून प्रकरण

आंबोली घाट खून प्रकरण

लोगो ः आंबोली घाट खून प्रकरण
--
80953

सावंतवाडी ः संशयितांना न्यायालयातून पोलिस ठाण्यात हजर करत असताना पोलिस.

खिल्लारेची कट रचूनच हत्या

सांगली जिल्ह्यातील आणखी दोघे ताब्यात; संशयितांची संख्या पाचवर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः आंबोली घाटात घडलेल्या खूनप्रकरणी येथील पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. स्वानंद भारत पाटील (वय ३१, रा. इस्लामपूर) व राहुल बाळासाहेब पाटील (वय २८, रा. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात आता एकूण सात संशयित झाले असून, कट करूनच पंढरपूर येथील मुकादम खिल्लारेचा खून केल्याचे समोर आले आहे. लाठ्या-काठ्या व कंबर पट्ट्यासह उसाने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कराड आणि पंढरपूरमध्ये करण्यात येणार असून याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी दिली.
सोळंके म्हणाल्या, ‘या प्रकरणात आणखी काहीजण असल्याचा आम्हाला संशय होता. त्यानुसार आम्ही सखोल चौकशी केली. यात अटकेत असलेल्या तुषार पवार याच्याकडे तपास केला असता त्या गुन्ह्यात आणखी काही जण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील तपासाला सुरुवात केली. यावेळी आणखी पाच नावे उघड झाली. त्यामुळे या गुन्ह्यात मृत्यू झालेल्या खिल्लारे याला एकूण सात जणांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील भाऊसो माने हा खिल्लारे याचा मृतदेह घाटात टाकत असताना दरीत कोसळून स्वतःच मृत्यूमुखी पडला.
दरम्यान, काल (ता. ५) अभय बाबासो पाटील (वय ३५), प्रवीण विजय बळीवंत (वय २५) व राहुल कमलाकर माने (वय २३) या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यांनतर अन्य दोघांची नावे उघड झाली. त्यानुसार त्या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. या खुनामागे आणखी काही उद्देश होता का, याबाबत अधिक तपास सुरू असून त्यामुळे संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.’’ यावेळी पोलिस सचिन कोयंडे, अमित राऊळ, काका कुडतरकर, सूरज पाटील, गजानन देसाई, भूषण भोवर आदी पोलिसांचे पथक कराड येथे काल (ता. ५) दाखल झाले होते. त्यांनी काल रात्री उशिरा संशयितांना अटक केल्याची माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com