एज्युकेशनशी संबंधित पट्टे

एज्युकेशनशी संबंधित पट्टे

यशवंतराव भाऊराव पाटील यांना अभिवादन
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचालित यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरमध्ये यशवंतराव आबासाहेब यांचा स्मृतिदिन झाला. यानिमित्त पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणपती आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच आजी-आजोबांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका छाया हिरुगडे, आजी- आजोबांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी आबासाहेबांचा आदर्श जीवनपाठ सांगितला. आजच्या पिढीमध्ये चांगले संस्कार होण्यासाठी आजी-आजोबांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींनी सर्व आजी-आजोबांचे औक्षण केले. सुतार यांनी अभंग सादर केला. सौ. कुंभार, श्री. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. काही आजी-आजोबांनी अभंग गायन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक सदस्या अनिता पाटील यांनी आजी-आजोबांविषयी मत व्यक्त केले. सौ. कचरे यांनी सूत्रसंचालन केले. रुपाली पाटील यांनी आभार मानले.
...
माता पालक संघातर्फे मेळावा
कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघ, माता पालक संघातर्फे माता पालक संघ मेळावा झाला. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. प्रिया दंडगे आणि पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा गीता कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मान्यवरांनी समुपदेशन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना आणि त्यांच्या मातांना माध्यमांचा वाढता प्रभाव, योग्य-अयोग्य निर्णय, स्वत:ला कसे सावरावे या विषयावर मार्गदर्शन केले. पालक शिक्षक संघाच्या सचिव ए. आर. नाईक, माता पालक संघाच्या प्रमुख व्ही. सी. शिंदे उपस्थित होते.
...


‘संत रोहिदासांचे समतावादी
विचारच प्रेरणादायी ठरतील’

कोल्हापूर : ‘प्राचीन काळातील अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट करून विषमतावादी समाज व्यवस्थेत समता प्रस्थापित करण्यासाठी संत रोहिदास यांनी सारे आयुष्य खर्ची घातले. पोती-पुराणांचा त्याग करून बुद्धिप्रामाण्यवादाला त्यांनी महत्त्व दिले. आजच्या विस्कळीत समाज व्यवस्थेला संत रोहिदासांचे समतावादी विचारच प्रेरणादायी ठरतील,’ असे मत चर्मकार कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक यादव यांनी व्यक्त केले.
संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त ‘अभिवादन’ कार्यक्रम बुरुड गल्ली येथील बुरुड समाज हॉलमध्ये झाला. बुरुड समाज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जयवंत सोनवले अध्यक्षस्थानी होते. गोकुळ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. चर्मकार कल्याण फाउंडेशनचे सचिव दत्तात्रय बामणेकर, सदस्य सुनील माने, हस्तकला कारागीर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र थोरावडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक खांडेकर, सदस्य, गणेश कांबळे, अजित अंकारे, तानाजी महाजन, गजानन सातपुते, सचिन सरपोतदार, काकासाहेब मोरे, रामचंद्र बिसुरे उपस्थित होते.
...
‘कमला’मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर परिसंवाद
कोल्हापूर : कमला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ यावर परिसंवाद झाला. अर्थसंकल्प म्हणजे काय, या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, सेवा क्षेत्र, महिला, बालकल्याणावर केलेल्या तरतुदी आणि त्याचा शेती, उद्योग, सेवा क्षेत्रावर होणारा परिणाम, शिक्षणातील तरतुदी, आदिवासींच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या विविध शैक्षणिक सुविधा आणि योजना, नवी आणि जुनी करप्रणाली याविषयी मुलींनी मते मांडली. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय, अर्थसंकल्प कसा मांडला जातो, अर्थसंकल्पाची गोपनीयता, अर्थसंकल्पात भरीव तरतुदी कशा केल्या जातात यावर मार्गदर्शन केले. डॉ. कबीर, प्रा. इनामदार यांनी अर्थसंकल्पावर मते मांडली. डॉ. आठवले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीमती मिणचेकर यांनी आभार मानले.
...
शाहू ज्येष्ठ संघातर्फे आज सभा
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे मासिक सभा बुधवारी (ता. ८) सायंकाळी चार वाजता बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे आयोजित केली आहे. एम. पी. पाटील हे ‘जरा इकडे लक्ष द्या ज्येष्ठांनो’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष डी. एस. घोलराखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com