पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

हसूर दुमालात मुलाकडून वडिलांना मारहाण

कोल्हापूर : हसूर दुमाला (ता. करवीर) येथे मुलानेच वडिलांना मारहाण केल्याची घटना काल घडली. याबाबतची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, निवास शामराव झांजगे (वय ३४, रा. हासूर दुमाला, ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, माझ्या वाटणीच्या जमिनीतील ऊस तोडू नका, असे म्हणून मुलगा निवास याने वडील शामराव ज्योती झांजगे (वय ६६) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हसूर दुमाला येथील शेतात काल हा प्रकार घडला. याबाबत वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी मुलगा निवास याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
............

पेन्शनच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लुटले
कोल्हापूर : पेन्शनच्या बहाण्याने वृद्धेचे पैसे, दागिने लंपास केल्याची घटना बिंदू चौकातील एका बॅंकेत घडली. याबाबत शालाबाई मारुती साळोखे (मोरेवाडी, ता. करवीर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, शालाबाई साळोखे या ७५ वर्षांच्या आहेत. पेन्शनचे पैसे काढण्यासाठी त्या बँकेत गेलेल्या होत्या. तेथे त्यांना सावित्रीबाई फुले पेन्शन योजनेंतर्गत दरमहा ४ हजार रुपये पेन्शन मंजूर करून देण्याचे आमिष एका भामट्याने दाखविले. त्या भामट्याने त्यांच्याकडील ४ हजार रुपये आणि सोन्याची कर्णफुले हातोहात लंपास केली. काल दुपारी हा प्रकार घडला. यानंतर साळोखे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित अनिल केंगार याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
............

शेतीच्या पाण्याच्या वादातून मारहाण

कोल्हापूर : शेतीच्या पाण्याच्या वादातून कसबा बावडा येथील साळोखे मळ्यात हाणामारी झाली. यामध्ये शिवाजी महादेव उलपे (वय ६०) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश नारायण पाटील (रा. पाटील मळा, कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मारहाणीचा प्रकार रविवारी रात्री झाला. याबाबतचा गुन्हा काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला.
------
शहर परिसरातून दुचाकी चोरीस
कोल्‍हापूर : ताराराणी चौक परिसरात उभ्या केलेल्या दोन दुचाकी चोरट्याने लंपास केल्या. ही घटना तीन फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत गुंजन रमेशभाई भदानिया (रा. रुईकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच अप्सरा टॉकिजजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. याबाबत विशाल मोहन भोकरे (रा. शाहूपुरी) यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
.............

मोटारचालकास बेदम मारहाण
कोल्‍हापूर : मोटार आडवी मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मोटारचालकास दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. कदमवाडी ते सदर बाजार मार्गावर काल दुपारी ही घडली. या हाणामारीत रवींद्र सदाशिव मोघवीर (वय ३६, रा. सदर बाजार) हे जखमी झाले आहेत. मोघवीर यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.