जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा
जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

sakal_logo
By

नाट्यछटा स्पर्धेला प्रतिसाद
मराठी अध्यापक संघातर्फे आयोजन; ९६ शाळांचा सहभाग

कोल्हापूर, ता. ७ ः जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटांमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून ९६ शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विक्रम हायस्कूल येथे शहरी आणि ग्रामीण अशा मुख्य दोन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. विजेत्या विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारीला राजर्षी शाहू स्मारक भवनात होणाऱ्या कार्यक्रमात पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती स्पर्धा समिती प्रमुख एम. एस. पाटील, प्रगती घाटगे, सचिन यादव, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
सविस्तर अनुक्रमे निकाल असा...
- शहरी विभाग- मोठा गट ः अर्णवी उपराटे (वि. दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज), सना मुल्ला (राजर्षी शाहू हायस्कूल, कोल्हापूर), कार्तिक कवितके
(वि.स.खांडेकर प्रशाला), सृष्टी मोहिते (मथुरा हायस्कूल), अक्सा पटेल (भाई माधराव बागल हायस्कूल).
- शहरी विभाग- लहान गट ः प्रणिती देशपांडे (छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज), सुहानी ऱ्हाटवळ (तेजस मुक्त विद्यालय), मयुरेश जोशी (वि.स.खांडेकर प्रशाला), आम्रपाली कांबळे (श्रीमती गंगामाई हायस्कूल, इचलकरंजी), हर्षवर्धन साळुंखे (नागोजीराव पाटणकर हायस्कूल),
- ग्रामीण विभाग- मोठा गट ः आर्यन कांबळे (आजरा हायस्कूल), कार्तिक पिंपळे (श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल), अनुष्का पाटील (न्यू हायस्कूल, देवाळे), आदित्यराज दीपक पाटील (व्यंकटराव हायस्कूल), समृद्धी शिवणे (व्यंकटराव हायस्कूल, आजरा),
- ग्रामीण विभाग- लहान गट ः वरद तोडकर (श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल),आराध्या बेळगुंदकर (सरस्वती हायस्कूल, हत्तीवडे),
सलोनी कुरुंदवाडे (काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी), सोहम पाटील (व्यंकटराव हायस्कूल, आजरा), विशाखा सुतार (ताराबाई अण्णासाहेब नरंदे हायस्कूल, नांदणी).