रेशन दुकान बंद

रेशन दुकान बंद

81199

जिल्ह्यातील १६४० रेशन दुकाने बंद
कमिशनसाठी आंदोलन; पाच हजार क्विंटल धान्य वाटप ठप्प

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : मोफत धान्य वाटपामध्ये कमिशन मिळत नसल्याने आज जिल्ह्यातील १६४० रेशन धान्य दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. तीन दिवस दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. कमिशन मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले जाईल. वेळेत निर्णय न घेतल्यास २२ मार्चला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला. दुकाने बंद ठेवल्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार क्विंटल धान्य वाटप ठप्प झाले आहे.
ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे राज्य सचिव चंद्रकांत यादव म्हणाले, ‘केंद्र सरकारने रेशनवर मोफत धान्य वाटप करण्याची योजना जाहीर केली आहे. एक वर्ष धान्य वितरण होणार आहे. धान्य वाटपाचे कमिशन कोण देणार याबद्दल माहिती दिलेली नाही. याशिवाय इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केले आहे. यापार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांनी आजपासून तीन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे. कोरोनाकाळातील मोफत धान्याचे १० महिन्यांचे कमिशन थकीत आहे. याचे कमिशन तत्काळ द्यावे. कोरोनाने मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करावे. रेशन दुकानांमध्ये तेल, डाळी, साखर कमी दरामध्ये दिले पाहिजे. साखर, धान्य व कडधान्यांसह डाळी कमी दरामध्ये मिळावे.’
कोल्हापूर रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिवसभरात शहरातील राजारामपुरी, टेंबलाईवाडी, सदरबाजार, राजेंद्र नगरसह हातकणंगले, पन्हाळा, कागल तालुक्यातील रेशन दुकानांना भेटी देऊन रेशन दुकानदारांशी चर्चा केली. गामाजी ठमके, रावसाहेब पाटील, आनंदा लादे, श्रीपतराव पाटील, दीपक चौगले, संदीप पाटील, पांडुरंग सुभेदार, राजेश मंडलिक, आबू बारगीर, संजय येसादे, विलास देशपांडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com