शशिकांत पवार निधन

शशिकांत पवार निधन

शशिकांत पवार यांचे निधन
मुंबई, ता. ७ ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष, तसेच मराठा समाज उन्नतीसाठी आणि आरक्षणासाठी धडपडणारे ज्येष्ठ शशिकांत पवार (८२) यांचे आज संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते, रत्नागिरीत मराठा बिझनेसमेन फोरमच्या बैठकीसाठी मुंबईहून आले होते. आज संध्याकाळी तेथून परत मुंबईकडे जाताना पाली परिसरात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच खोपोलीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा मोठा परिवार आहे.
त्यांनी मराठा आरक्षणासाठी या वयातही आंदोलन केले. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरू असून त्यासाठी त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते. कट्टर मराठा नेते असले तरी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता.
शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू झाली. १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र, त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे १९६४ पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी १९८० पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com