मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम ः रविंद्र माने

मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम ः रविंद्र माने

मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरावा.

मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त
आज विविध कार्यक्रम ः रविंद्र माने

इचलकरंजी, ता.८ ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. ९) बाळासाहेबांची शिवसेना
यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. याबाबतची माहिती कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी आज दिली.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी सांगली वेस मारुती मंदिर येथे महाबली हनुमान महाअभिषेक करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महाप्रसाद व खिचडी वाटप केले जाणार आहे. याशिवाय रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात धान्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये नृसिंहवाडी येथे महाभिषेक केला जाणार आहे. कुरुंदवाड येथे सांस्कृतिक कार्यक्रम, शिरढोण येथे रक्तदान शिबिर, निमशिरगाव येथे अनाथ आश्रमामध्ये फळे व खाऊ वाटप, जयसिंगपूर येथे वृद्धाश्रमामध्ये फळे व दूध वाटप करण्यात येणार आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये वडगाव शहरातील वृद्धाश्रमात भोजन वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. अनाथ आश्रमातील मुलांना वह्या व भोजन वाटप तसेच हुपरी शहरामध्ये श्री अंबाबाई मंदिरामध्ये देवीला महाभिषेक व प्रसाद वाटप केले जाणार आहे. तसेच डिजिटल बोर्डाचे अनावरण आणि ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप होणार आहे.
पट्टणकोडोली येथे शेती अवजारे प्रदर्शन व विक्री तसेच आयुष्मान कार्ड व आधार कार्ड यांचे वितरण होणार आहे. कोल्हापूर जिल्हा युवा सेनेतर्फे वृद्धाश्रमात फळे वाटप, भोजन वाटप व आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम होणार असल्याचे माने यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com