स्थगित केलेल्या परीक्षांचा १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थगित केलेल्या परीक्षांचा १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ
स्थगित केलेल्या परीक्षांचा १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ

स्थगित केलेल्या परीक्षांचा १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ

sakal_logo
By

विद्यापीठाच्या स्थगित परीक्षा सोमवारपासून

महाविद्यालयांवर पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षांची जबाबदारी; ३५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ः विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शिवाजी विद्यापीठाने २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. त्या परीक्षांचा प्रारंभ सोमवार (ता. १३) पासून होणार आहे. त्यात पहिल्यांदा बी. कॉम. भाग एक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्याचे वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आज जाहीर केले.
गेल्या दोन वर्षांपासून बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. भाग एक अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयांकडून घेतल्या जात आहेत. विद्यापीठ या परीक्षांचे वेळापत्रक ठरवून देण्यासह महाविद्यालयांना प्रश्‍नपत्रिका पुरवित होते. मात्र, यावर्षी विद्यापीठाने वेळापत्रक निश्‍चिती, प्रश्‍नपत्रिका तयार करण्यासह परीक्षा घेण्यापर्यंतची सर्व जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यानुसार बी. ए., बी. एस्सी भाग एकच्या परीक्षा १५ ते २९ फेब्रुवारीदरम्यान घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. एम.ए., एम. एस्सी., एमबीए., बी. टेक., एमसीए., अशा विविध २२ अभ्यासक्रमांची एकूण ५६०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा मंडळाने आतापर्यंत एकूण ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. दरम्यान, राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे परीक्षा कामकाजावरील बहिष्कार आंदोलन सातव्या दिवशीही कायम राहिले.
...

‘शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा सुरळीत आणि कमी वेळेत होण्यासाठी बी. ए., बी. एस्सी भाग एकच्या सत्र एक आणि दोनच्या परीक्षांचा जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली आहे. मूल्यमापनाच्या प्रक्रियेत अखंडितपणे सुरू रहावी यासाठी बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या उर्वरीत परीक्षा सोमवार, मंगळवारी घेण्यात येणार आहेत.
-डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ