वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार
वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार

वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार

sakal_logo
By

वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार
२८ ला प्रस्तावाची होळी करणार; इचलकरंजीतील बैठकीत निर्णय

इचलकरंजी, ता.९ ः वीज दरवाढी विरोधात १४ फेब्रुवारीपर्यंत हजारो हरकती दाखल करण्यासह २८ फेब्रुवारीला वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व राजकीय पक्ष, संस्था यांच्या प्रतिनिधींची बैठक महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयात झाली. यामध्ये हा महत्वाचा निर्णय घेतला. आंदोलनात शहर व परिसरातील सर्व वीज ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
वीज ग्राहकांच्या बिलात ५० टक्यांहून अधिक वाढीची महावितरण कंपनीने मागणी केली आहे. या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला शहर व परिसरातील सर्व औद्योगिक, व्यापारी, ग्राहक संघटना व राजकीय पक्षांतर्फे विरोध करण्यावर बैठकीत चर्चा झाली. अध्यक्षस्थानी प्रताप होगाडे होते. महाराष्ट्रातील वीज दर आजचा इंधन समायोजन आकार सोडला तरीही देशात सर्वात जास्त आहे. अशा परिस्थीतीत थोडी जरी दरवाढ झाली तरी यंत्रमाग, वस्त्रोद्योग, इंजिनिअरींग हे शहरातील प्रमुख उद्योग व संबंधित व्यवसाय टिकूच शकणार नाहीत, असे मत यावेळी व्यक्त केले.
पुंडलीक जाधव, चंद्रकांत पाटील, सतिश कोष्टी, दीपक राशिनकर, अहमद मुजावर, महादेव गौड, संजय वठारे, सदा मलाबादे यांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. या प्रश्नी आपल्या भागातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, पालकमंत्री यांना भेटून निवेदन देण्याचे यावेळी ठरले. बैठकीस धर्मराज जाधव, महावीर शिरगुप्पे, अजय मनवाडे, अनिल मगदूम, शिवाजी केसरे, गौस आत्तार, मुकुंद माळी, अनिल बागणे, सुनिल मेटे, दिनकर अनुसे, गणेश भांबे, शिलकुमार पाटील, दिलीप ढोकळे, मोहन ढवळे, संभाजी सुर्यवंशी, सुरेश भुते, बाबासो कोतवाल, उमेश लाड, रावसाहेब तांबे, विकास चौगुले, प्रताप पाटील आदी उपस्थीत होते.