कानोलीत विकासकामांचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानोलीत विकासकामांचा प्रारंभ
कानोलीत विकासकामांचा प्रारंभ

कानोलीत विकासकामांचा प्रारंभ

sakal_logo
By

कानोलीत विकासकामांचा प्रारंभ
भादवण, ता. १० ः कानोली (ता. आजरा) येथील मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण यांसह दहा लाखांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते झाला. आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्याहस्ते पूजन झाले. आमदार पाटील म्हणाले, ‘‘कानोलीतील विविध विकासकामांसाठी निधी दिला जाईल. गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.’’ जिल्हा बँकेंचे संचालक सुधीर देसाई, माजी सभापती अल्बर्ट डिसुझा, जनार्दन बामणे, सरपंच सुषमा पाटील, ग्राम पंचायत सदस्य सुधीरकुमार पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, सारिका भोसले, दिपाली सुतार, पोलिस पाटील अनिल मुरूकटे, गजानन दूध संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पाटील, माजी सरपंच राजू मुरुकटे, पांडुरंग भोसले, मारुती पाटील, परशुराम आपगे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी आभार मानले.