केएमटी बससेवा

केएमटी बससेवा

अंबाबाई दर्शनासाठी एसटी स्टॅंडवरून
अर्ध्या तासाला केएमटी बससेवा
कोल्हापूर, ता. ९ : अंबाबाई दर्शन तसेच पर्यटनासाठी बाहेरगावाहून खासगी वाहनांबरोबरच एसटीनेही मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्यासाठी केएमटी उद्यापासून (ता. १०) एसटी स्टॅंडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दर अर्ध्या तासाला बसची शटल सेवा सुरू करणार आहे.
श्री अंबाबाई दर्शनासाठी अनेक भागातून भाविक एसटीने येत असतात. त्यांना मंदिरापर्यंत वा त्या परिसरात जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करावी लागते. अनेकवेळा बस येत नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागतो. त्यातून भाविकांच्या मनात शहराबाबत नकारात्मक भावना निर्माण होत असल्याने केएमटीने शुक्रवारपासून (ता. १०) सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत दर अर्ध्या तासाला शटल बससेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टॅंड परत छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शटल बस सेवा सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा श्री अंबाबाई मंदिराजवळ असल्याने तिथून प्रवाशांना सोईचे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com