रात्रीच औषध मिळेल पण जागेवर पोहच मुश्कील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रात्रीच औषध मिळेल पण जागेवर पोहच मुश्कील
रात्रीच औषध मिळेल पण जागेवर पोहच मुश्कील

रात्रीच औषध मिळेल पण जागेवर पोहच मुश्कील

sakal_logo
By

81680
कोल्हापूर : रात्री उशीरापर्यंत औषध पुरवठा करणारी दुकाने आहेत मात्र रात्री औषधे जागेवर पोहोच मिळणे मुश्कील ठरते.

लोगो - रात्रीचं जागणं-भाग १९


आत मुलगा अस्वस्थ; बाहेर आई कासावीस...
सीपीआर रुग्णालय परिसरात घालमेल; रात्री औषधे जागेवर पोहोच मिळणे मुश्कील
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : रात्री अपरात्री गंभीर रूग्ण व जखमींना औषध देण्यासाठी रात्र सेवेची औषध दुकान मोजकी आहेत, पण सीपीआर रुग्णालय परिसरात एखादे औषध मिळाले नाही आणि औषध आणण्यासाठी रूग्णासोबत पुरेसे मनुष्यबळ नसेल, तर नातेवाइकांची कशी घालमेल होते; हे बुधवारी रात्री दिसून आले. यावरून रात्री औषधे जागेवर पोहोच देण्याची व्यवस्था किती गरजेची आहे; हे अधोरेखीत झाले.
जिल्हाभरातील दिड हजारावर खासगी व शासकीय रूग्णालयात, दहा हजारांवर रूग्ण किंवा जखमी उपचार घेतात. अशा रूग्णांना वेळीच औषध पुरवठा व्हावा यासाठी मोठ्या रूग्णालयात औषध दुकाने जोडून दिवस-रात्र सुरू असतात. त्यासोबत शहरात शाहुपुरीत रात्रसेवेचे पूर्वीपासूनचे औषध दुकान त्यासोबत सीपीआर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, ताराबाई पार्क, राजारामपुरीत रात्रीची औषध दुकानेही खुली होती.
सीपीआरच्या आवारात रात्री एक मेडीकल सुरू होतं. रात्री पावनेबारा वाजता एक महिला आली. औषधांची चिठ्ठी दिली, दुकानदाराने औषधे नसल्याचे सांगितले. कुठे मिळले? शिवाजी चौकात बघा उत्तर आले. पेशंटला एकटा सोडून जाणे शक्य नसल्याने महिलेने रस्त्यावर येणा-जाणाऱ्या दोघांना औषधं आणून देण्याची विनंती केली. पण त्या दोघांनी आमचं पेंशट सिरियस आहे, असे सांगत औषधं आणण टाळलं. तशी महिला खिन्न होऊन आवारात फिरू लागली. माहिती घेतली असता ग्रामीण भागातील महिला मुलाला उपचारासाठी दाखल केलयं, तो अधून-मधून रडतो, किंचाळतो.
महिला अल्पशिक्षीत होती, तिला रस्ते माहित नव्हते, सोबत कोणी आलेही नव्हते. इकडे डॉक्टर औषध आणा म्हणून सांगत होते. आपण पेशंट मुलाला सोडून दूरवर जावू शकत नाही, अशा चिंता घेऊन महिला उभी होती तशी रात्र चिंतत पुढे सरकत होती.
-------------
चौकट
पार्सल बॉय उणीव
टेली मेडिसीनची सविधा झाली, पण या क्षणी महिलेला उपयोग नव्हता कारण अपरात्री औषध जागेवर पोहोच देणारी सेवा मोजकी तिही ऑनलाईन आहे. त्यांचानंबर सीपीआर आवारात नाही तसा इतर दवाखान्यात नाहीत. नंबर असला तरी अल्पशिक्षित वर्गाला तो वापरता येणे पैसे ऑनलाईन पेड करणे त्याहून अवघड होते. तेव्हा अनेक रूग्णालयात औषध शोधणाऱ्यांची रोजची चिंता वाढते. त्यामुळे रात्रीच्या औषध सेवेला फोन केला की औषध जागेवर पोहोच करणाऱ्या पार्सल बॉयची गरज मात्र या समस्येत अधोरेखीत झाली.